मोहन अटाळकर

मेडशी ( जि. वाशीम) : खासदार राहुल गांधी यांच्‍या भारत जोडो यात्रेदरम्‍यान बुधवारी रात्री मेडशी येथील जाहीर सभेनंतर भारताच्‍या राष्‍ट्रगीताऐवजी काही सेकंद नेपाळचे राष्‍ट्रगीत वाजवण्‍यात आल्‍याने गोंधळ उडाला. यावरून आता राहुल गांधी यांना भाजपकडून लक्ष्‍य केले जात आहे.

हेही वाचा… साताऱ्यात दोन्ही राजांनी एकत्र येण्याची भाजपची सूचना; पालिका निवडणूक पक्षचिन्हावर लढविण्यास पक्ष ठाम

हेही वाचा… जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भात असून मेडशी येथे त्‍यांची एक सभा पार पडली.सभा आटोपल्‍यानंतर व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधींसह सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते. पण त्याचवेळी राष्ट्रगीताऐवजी दुसरेच गाणे वाजू लागले. राष्ट्रगीतासाठी सगळे उभे असताना चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले. सुरुवातीचे काही सेकंद फक्त गाण्याचे संगीत होते. त्यानंतर जेव्हा गाण्याचे बोल सुरू झाले. तेव्हा राहुल गांधी व व्यासपीठावरील इतर नेत्यांच्या लक्षात आले. हे भारतीय राष्ट्रगीत नसून दुसरेच गाणे आहे. त्यानंतर तातडीने राहुल गांधींनी हे गीत थांबवण्यास सांगितले. नंतर राष्‍ट्रगीत सुरू करण्‍यात आले. पण, या घटनेने विरोधकांना राहुल गांधी यांच्‍यावर टीकेची संधी मिळाली आहे.