मुंबई : आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होत आहे अशा शब्दांत विधानसभा अध्यक्षांना ऐकवत सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आक्रमक झाले होते . मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थांबवले. यावर लागलीच हरकतीचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला.

हेही वाचा… सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठापुढे सोपविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचा… तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत, विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांचा पुन्हा इशारा 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेत आज पुरवणी मागणीवर चर्चा होत असताना सभागृहात विभागाचे मंत्रीच उपस्थित नव्हते. या विषयाकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. मंत्री नाहीत तर उत्तरे कोण देणार ? उत्तर द्यायची नसतील तर खातेवाटप कशासाठी केले ? ४० दिवस विस्तार थांबवला आता उत्तराला टाळाटाळ करत आहेत असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी सरकारवर केला.