Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी १ डिसेंबरला नागपूर या ठिकाणी पार पडलेल्या कठाळे कुलसंमेलनात एक वक्तव्य केलं या वक्तव्याची चर्चा देशभरात होते आहे. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी असं म्हटलं की भारताची लोकसंख्या कमी होऊ नये यासाठी लग्न झालेल्या जोडप्यांनी किमान तीन मुलांना जन्म दिला पाहिजे. त्यांचा रोख घटणाऱ्या हिंदू लोकसंख्येकडे होता. ज्यावरुन आता मोहन भागवत यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

मोहन भागवत काय म्हणाले?

मोहन भागवत यांनी देशातल्या घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली. मोहन भागवत म्हणाले “लग्न झालेल्या जोडप्यांनी कमीत कमी तीन मुलांना जन्म दिला पाहिजे.” यानंतर मोहन भागवत यांच्या वक्तव्यार टीका होते आहे. काँग्रेस आणि विरोधकांनी या वक्तव्यावर टीका केली आहे.

रेणुका चौधरी काय म्हणाल्या?

मोहन भागवत यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या, “ज्या तरुणांना नोकरी नाही अशा तरुणांना कुणीही आपल्या मुली देत नाहीत. या मुलांना त्यांचे आई वडील सांभाळतात. ज्यांना मुलांना सांभाळण्यासाठी कामं करावी लागतात. तसंच जी लग्न झालेली जोडपी आहेत त्यांना त्यांचं उत्पन्न पुरत नाही. अशा परिस्थितीत मोहन भागवत सांगत आहेत की किमान तीन मुलांना जन्म द्या. आपण माणसं आहोत, ससे नाही जे मुलांना सारखं सारखं जन्म देत राहतील.” अशी खोचक टीका रेणुका चौधरींनी केली आहे.

हे पण वाचा- किमान दोन किंवा तीन अपत्ये गरजेची, हिंदूच्या घटत्या लोकसंख्येवर सरसंघचालक मोहन भागवत यांची चिंता

अभिषेक मिश्रा म्हणाले हा प्रत्येकाचा खासगी निर्णय

समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्रा म्हणाले, “कुणी किती मुलं जन्माला घालावी हा त्या कुटुंबाचा निर्णय आहे. तो निर्णय त्या कुटुंबावर सोडला पाहिजे. मूल जन्माला घालणं किंवा न घालणं हा सर्वस्वी लग्न झालेल्या जोडप्याचा निर्णय आहे. त्यांच्या इतक्या खासगी निर्णयात कुणीही लक्ष घालता कामा नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिंदा करात यांचीही सरसंघचालकांवर टीका

सीपीआय एम च्या नेत्या ब्रिंदा करात म्हणाल्या “मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांना महिला म्हणजे नेमकं काय वाटतात? महिला या काही मुलं जन्माला घालण्याचं एखादं मशीन नाहीत. तीन मुलं जन्माला घाला असा सल्ला देऊन भागतव यांनी एक प्रकारे महिलांचा अपमानच केला आहे.” एकंदरीत या टीका पाहिल्या तर मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांच्या वक्तव्याबाबत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत.