भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पुढच्या वाटचालीबाबत स्पष्ट संदेश देऊन याच मुद्द्यावरून पक्षाने जनतेशी संवाद साधत त्यांच्यापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. याचसाठी भाजपाने मंगळवारपासून देशभरात ११ दिवसांची तिरंगा यात्रा काढणार असल्याचे सांगितले आहे. सोमवारी पक्षाने भारताच्या पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबाबत पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी देशाचे उद्दिष्ट कसे साध्य केले, याबाबत सविस्तर माहिती दिली.
रविवारी रात्री पक्षप्रमुख जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित होते. या बैठकीत पक्षाचा नेमका दृष्टिकोन निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आढावा भारताच्या सशस्त्र दलांनी मिळवलेल्या यशाचा असेल. शस्त्रविराम कायम ठेवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: पुढाकार घेतला आहे, असंही पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
शस्त्रविरामाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांना उत्तर कसे द्यायचे. तसंच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियो यांनी भारत-पाकिस्तान तटस्थपणे विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहमत झाले आहेत, या विधानाला उत्तर कसं द्यायचं असे प्रश्न सध्या भाजपाला पडले आहेत. ट्रम्प यांच्या मध्यस्थीला विरोधी पक्षाकडून प्रतिक्रिया आल्या होत्या आणि त्यांनी अमेरिकेची भूमिका नक्की काय, याबाबत भाजपाकडे स्पष्टीकरणही मागितले होते.
पाकिस्तानशी कोणतीही चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असा मोदींचा भाषणातील संदेश विरोधकांच्या टीकेला स्पष्ट असल्याचे दिसून येते.
काही भाजपा नेत्यांच्या म्हणण्यांनुसार, शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर ऑपरेशन सिंदूरबाबत राजकीय प्रभुत्व कसे घ्यावे याबद्दल पक्षातील नेते स्पष्ट माहितीची वाट पाहत आहेत. यामध्ये शस्त्रविराम आणि त्याचे परिणाम स्पष्ट करणे यांचाही समावेश आहे. काही विरोधी नेते भाजपाची भूमिका उत्तमरित्या स्पष्ट करत होते, असे एका सूत्राने सांगितले. असं असताना शनिवारी संध्याकाळी ड्रोन हल्ले सुरू राहिल्याने सविस्तर माहिती देण्यास उशीर झाला. त्यानंतर आम्ही एखादी रात्र शांत असावी अशी आशा बाळगली आणि रविवारी ते साध्य झालं, असं पक्षाच्या एका सूत्राने सांगितलं आहे.
“संवादात कोणताही विलंब किंवा गोंधळ झालेला नाही. सशस्त्र दल दररोज सविस्तर माहिती देत होते. दिवसातून एक ते दोन वेळा माहिती दिली जात होती. भाजपाची भूमिका ही सरकारची भूमिका आहे. हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. आम्ही सर्व त्याच्याशी सुसंगत आहोत. आमच्या सशस्त्र दलांनी आणि एमईएने भारताची भूमिका अत्यंत खात्रीपूर्वक आणि स्पष्टपणे मांडण्याचे काम केले आहे”, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले आहे.
लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत विश्लेषण आणखी सविस्तर असू शकते, अशा सूचना रविवारी झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. सोमवारी एअर ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए के भारती, मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि नेव्हल ऑपरेशन्सचे महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी माध्यमांना ब्रीफींग दिले.
तिरंगा यात्रेचा उद्देश्य काय?
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भाजपाच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी असे प्रतिपादन केले की, पहलगाम हल्ल्यामागील दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा देण्याचे आणि त्यांची सुरक्षित ठिकाणे उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे वचन पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आहे.
पाकिस्तानने नऊ दहशतवादी तळ, ११ हवाई तळ, १०० हून अधिक दहशतवादी, ५० सैनिक आणि त्यांची प्रतिष्ठा गमावली आहे”, असे पात्रा यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूरने १०० टक्के लक्ष्य गाठले.
सिंधू पाणी करार रद्द करण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, यात एक गैर-लष्करी घटकदेखील होता. याचा परिणाम पाकिस्तानच्या कृषी क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के भागावर होईल आणि त्याचा जीडीपी आणखी कमकुवत होईल असेही ते म्हणाले.
१३ ते २३ मेदरम्यान तिरंगा यात्रेत भाजपा तसंच विविध सत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश असेल. तसंच सर्व सहभागी या यात्रेत तिरंगा घेऊन सहभागी होतील. या यात्रेत पंतप्रधान मोदींचा संकल्प आणि दृढनिश्चय तसेच सशस्त्र दलांचे शौर्य अधोरेखित केले जाईल, असे पक्षाने म्हटले आहे.