प्रशांत देशमुख

वर्धा : वैद्यकीय महाविद्यालय मिळावे म्हणून हिंगणघाटकरांनी प्रतिष्ठेचा केलेला मुद्दा आमदार समीर कुणावार यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरण्याचे चिन्ह आहे. राज्य शासनाने नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वर्धा जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात हे वैद्यकीय महाविद्यालय वर्धेलगत साटोडा या जागी स्थापण्याचे निश्चित झाले. मात्र, घोषणा होताच वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून मोठा सूर उमटला. नागरी संघर्ष समिती स्थापन झाली.

challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

डॉ. आंबेडकर चौकात समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. आता त्याला ६३ दिवस लोटत असून संघर्ष समितीच्या काहींनी मुंबईच्या आझाद मैदानात लढा सुरू केला. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. लगेच विधिमंडळात प्रश्नही उपस्थित केला. हिंगणघाटकरांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्यामुळे आमदार कुणावार यांनीही मग प्रश्न मांडला. मात्र, तोपर्यंत पुलावरून बरेच पाणी वाहून गेले होते. महाविद्यालयाच्या प्रश्नावर आमदार एकीकडे तर इतर पक्ष त्यांच्या विरोधात एक झाल्याचे चित्र उमटले होते. सुरुवातीला कुणावार यांनी हिंगणघाट रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य केले होते. आतापर्यंत हे का झाले नाही, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. तसेच हिंगणघाटला जिल्हा रुग्णालयाचा दर्जाही मिळवून घेतला.

हेही वाचा >>> मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडून खुलासा मागावणार; ‘प्लॅटिनम ज्युबिली’ उत्सव वसुलीप्रकरण विधान परिषदेत

मात्र, या आंदोलनावर त्याचा काडीमात्र फरक पडला नसल्याचे आंदोलनातील महिलांच्या वाढत्या सहभागाने दिसून आले. लहान थोर सर्वच या आंदोलनात भाग घेऊ लागले. भाजप विरुद्ध इतर असे चित्र उमटत असल्याचे पाहून भाजपच्या स्थानिक वर्तुळात अस्वस्थता पसरू लागली. कुणावार उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून मागणी मांडून आले. पण, ही सारवासारव असल्याचीच चर्चा झाली. भावनेच्या हिंदोळ्यावर खेळणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून हिंगणघाटची ओळख निर्माण झाली आहे. म्हणून हा आमचा बालेकिल्ला असा दावा करण्यास कुणी धजावत नाही. काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे विविध पक्षांचे आमदार इथे निवडून आले आहेत. पक्षनिष्ठा किंवा विचार हा इथल्या मतदारांचा स्थायीभाव नाही. एखादा मुद्दा उठतो व पुढे तोच निवडणुकीचा मुख्य पैलू ठरल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा >>> मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाले; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रशासनात खळबळ

या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आमदार कुणावार यांच्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहे. यापूर्वी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत व त्यानंतर हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणुकीत कुणावार यांनी घेतलेली भूमिका भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ नेते वर्तुळात भुवया उंचावणारी ठरली होती. ते शमत नाही तोच आता हिंगणघाटकरांनी प्रतिष्ठेचा केलेला वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा कुणावार यांच्या अडचणीत भर टाकणाराच ठरणार. पुढे तो निवडणुकीचा मुद्दा ठरू नये म्हणून ते काय पाऊल उचलतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आघाडीच्या पारंपरिक वाटाघाटीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. पुढेही तो राहणारच अशी खात्री बाळगून राष्ट्रवादीचे नेते या आंदोलनात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सरसावले आहेत. तूर्तास ही लढाई कुणावार विरुद्ध इतर अशीच दिसत असल्याने भाजपसाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो.