बिहार विधानसभेतील सर्वात गरीब आमदार रामवृक्ष सदा यांना नुकत्याच त्यांच्या नव्या घराच्या चाव्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुपुर्द केल्या आहेत. यावेळी भावनिक झालेल्या सदा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नव्या घराच्या चाव्या मिळताच सदा यांनी मुख्यमंत्र्यांचे चरणस्पर्श केले. हे घर मिळणं म्हणजे गरिबासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही, अशी भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली. “राजधानीच्या मध्यभागी सरकारी घराच्या चाव्या मिळाल्यानंतर मी भावनिक झालो. मी अशा घरात राहू शकेल, असं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं”, अशी प्रतिक्रिया सदा यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमध्ये ‘पंजाब पॅटर्न!’ आप पक्षाकडून ‘तुम्हीच तुमचा मुख्यमंत्री निवडा’ मोहिमेला सुरुवात; भाजपा, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

खागरिया जिल्ह्यातील रौन या गावातील रामवृक्ष सदा यांचं जुनं घर

खागरिया जिल्ह्यातील रौन या गावात सदा त्यांच्या कुटुंबियांसह दोन खोल्यांच्या घरात राहतात. हे घर त्यांनी २००४ साली ‘इंदिरा आवास योजने’तून बांधलं होतं. अलौली मतदारसंघातून सदा आरजेडीचे आमदार आहेत. मुशाहर या अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करणारे सदा यांच्या नव्या घराचा पत्ता आता पाटण्यामधील बीर चंद पटेल मार्ग असणार आहे. या ठिकाणी तीन मजली इमारतीत ते राहणार आहेत. त्यांचं हे नवं घर बिहार विधानसभेच्या जवळ आहे. राज्य सरकारच्या आमदारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या आठ लाभ्यार्थांपैकी सदा एक आहे.

‘भारत जोडो’ नंतर गुजरातमध्ये काँग्रेसची ‘परिवर्तन संकल्प यात्रा’; तीन दशके सत्तेत असलेल्या भाजपाची चिंता वाढणार?

पाटण्यामधील रामवृक्ष सदा याचं नवं सरकारी घर

४७ वर्षीय सदा यांना पाच मुलं आणि एक मुलगी आहे. सात खोल्यांचं घर मिळालं आहे, यावर अजुनही विश्वास बसत नसल्याचं सदा यांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत ते १२ जणांच्या एकत्र कुटुंबात दोन खोल्यांच्या घरामध्ये राहत होते. २०२० मध्ये पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदा यांची संपत्ती ७० हजार असल्याचे नमुद आहे. त्यापैकी २५ हजार रोख आणि पत्नीकडे पाच हजार असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. या प्रतिज्ञापत्रात सदा यांच्या गावातील घराची किंमत ३० हजार तर शेतीची किंमत १० हजार असल्याचे नमुद आहे. याही वर्षी ही संपत्ती ७० हजार असल्याचं सदा यांनी घोषित केलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poorest mla of bihar got new government home cm nitish kumar handover key left ramvrikish sada emotional rvs
First published on: 29-10-2022 at 17:23 IST