राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.  

राष्ट्रपती निवडणुकीची राजकीय गणिते

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत. 

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
sharad pawar
“…तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही”, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल मांडत शरद पवारांची टीका
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
archana patil dharashiv ncp candidate
राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!

विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सर्व समविचारी पक्षांची संमती असलेला उमेदवार निवडला जाईल आणि त्यासाठी सर्वांशी चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. औपचारिक बैठक अजून ठरलेली नसल्याची माहिती एका जेष्ठ काँग्रेस नेत्याने दिली.  दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असणारा आप पक्ष काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे. कारण काँगेस आणि आप यांच्यात चांगलेच बिनसले आहे. दोन्ही पक्ष रोज एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपाला विरोध असल्यामुळे भजापा हा ‘आप’साठी पर्याय नसेल. 

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.