पुन्हा एकदा सिद्ध झालं की पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये सरकारही अलबेल नाही. कारण, पक्षाचे अमृतसर(उत्तर) बहुचर्चित आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभेच्या आश्वासन समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी आपला राजीनामा पंजाब विधानसभेच्या सचिवांना ईमेलद्वारे पाठवला आहे.

अशी माहिती समोर येत आहे की, कुंवर विजय प्रताप सिंह यांनी २०१५ च्या धर्माचा अनादर करणाऱ्या प्रकरणांच्या आढाव्यासाठी २० जानेवारी रोजी मुख्य सचिव आणि पंजाबच्या डीजीपींची बैठक बोलावली होती. विधानसभा अध्यक्षांनी त्याच दिवशी विधानसभेच्या समितींची बैठक बोलावली होती. मात्र कुंवर विजय प्रताप सिंह यांनी बोलावलेल्या बैठकीमुळे सर्व अन्य समितींच्या बैठका रद्द कराव्या लागल्या होत्या. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कुंवर विजय प्रताप सिंह यांनी अनादर प्रकरणाच्या तापसाबाबत विस्तृत चर्चा केली होती आणि या संदर्भात संपूर्ण दिवस चर्चेसाठी ठेवण्याची मागणी विनंती सभापतींना केली होती, परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

प्राप्त माहितीनुसार विधानसभा कार्यालयास त्यांचा राजीनामा मिळाला असून, आता त्यावर अंतिम निर्णय विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंह संधवान घेणार आहेत.

कुंवर विजय प्रताप सिंह यांचा राजीनामा ही एक मोठी घटना आहे. यामुळे आम आदमी पार्टीमध्ये चांगलीच खबळबळ उडाली आहे. एका आमदाराने सांगितले की, कुंवर विजय प्रताप सिंह यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे ते पक्षावर नाराज आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिशय शिस्तप्रिय असलेल्या कुंवर विजय प्रताप सिंह यांनी जर तोंड उघडले तर या सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकारीही अडचणीत येतील, असे आम आदमी पार्टीशी संबंधित काही ज्येष्ठ नेते आणि आमदारांचे मत आहे. २६ जानेवारी नंतर या संपूर्ण घडामोडींना वेग येईल, अशी कुजबुज आहे.