महाराष्ट्रात ‘मिशन-१००’ ची घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची बेरीज कुठेतरी चुकलेली दिसते. गेल्या दोन निवडणुकांपासून त्यांची उडी ४०-५० च्या पुढे गेलेली नाही. ५५ वरच ते थांबले आहेत. आता यापुढे ही संख्या आणखी कमी होऊ नये, याची काळजी त्यांनी घ्यावी, असा टोला भाजपा नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावला आहे.

हेही वाचा- सुषमा अंधारेंच्या जळगाव दौऱ्यातून प्रबोधन कमी, विरोधकांना धडकीच अधिक

मंत्री विखे आज, रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी येथे झालेल्या शिबिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदी तोडफोड करून सत्ता मिळवतात, असाही आरोप त्यांनी केला होता. त्याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. मात्र त्यांनी पंतप्रधानांवर टीका करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. शरद पवार यांनी संपूर्ण कारकिर्दीत किती तडजोडी केल्या आहेत हे सर्व देशाने पाहिले आहे.

हेही वाचा- नाशिकचे सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरून शिंदे गट- भाजपामध्ये मतभेद

 महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी ज्या पक्षांचा दुरान्वयेही काही संबंध नव्हता, असे पक्ष तत्त्व गुंडाळून शरद पवार यांनी एकत्र आणले. आता राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेकडे हे पक्ष पाठ फिरवत आहेत. शिवसेना आमचा नैसर्गिक पक्ष नाही असे सांगत काँग्रेस त्यांना सोडचिठ्ठी देत आहे. सत्ता गेली की आता ते तत्त्व गुंडाळून ठेवावे लागले आहेत, त्यामुळे पवार यांना टीका करण्याचा अधिकारच नाही.

हेही वाचा- ठाण्यातील सुलेखा चव्हाण यांचा भाजपा प्रवेश कुणामुळे रखडला?

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले की केवळ लोकप्रियतेसाठी अशी मागणी केली जात आहे. काहीजण प्रश्नांचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला आम्ही बळी पडणार नाही. ते सरकारमध्ये असताना त्यांनी काय दिवे लावले हे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. मात्र, आम्ही मदतीचा हात आखडता घेणार नाही. मदत करण्याच्या मर्यादाही आम्ही वाढवल्या आहेत.