राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा अभियानाची जोरदार तयारी असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘मेक इंडिया नंबर वन’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. केजरीवाल यांच्या घोषणेने काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोचून काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा मेक इन इंडिया नंबर वन कार्यक्रमातून भारतीय राजकारणात काँग्रेसची जागा घेण्याचे प्रयत्न आहे. या कार्यक्रमामुळे  केली.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रचार मोहिमेबद्दल  स्पष्टीकरण दिलं आहे. हा एक योगायोग असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑगस्टमध्येच त्यांच्या मेक इंडिया नंबर वन कार्यक्रमाची घोषणा केली होती मंगळवारी त्यांनी प्रचार मोहिमेस सुरुवात केली. सूत्रांनी सांगितले की, केजरीवाल गुरुवारी हरियाणामध्ये आणखी एका सभेला संबोधित करू शकतात. उर्वरित योजना अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

मंगळवारी आपल्या प्रचार योजनांची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की “आम्ही काही दिवसांपूर्वी मेक इंडिया नंबर वन नावाची मोहीम सुरू केली. भारत जगातील सर्वोत्तम देश बनणे हे १३० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. ७५ वर्षांपूर्वी आपण स्वतंत्र झालो, तरीही भारत मागे आहे, असा प्रश्न ते विचारत आहेत. अनेक देशांनी आपल्याला मागे टाकले. आज जेव्हा भारताला एक गरीब आणि मागासलेला देश असे लेबल लावले जाते तेव्हा आपल्या मनाला वेदना होतात. १३० कोटी भारतीयांना भारताला विकसित देश बनवायचे आहे. भारत हा समृद्ध आणि संपन्न देश असायला हवा. भारत हा जगातील सर्वात शक्तिशाली देश असावा.

आम आदमी पक्षाच्या एक वरिष्ठ नेत्याने  राहुल यांची यात्रा आणि केजरीवाल यांच्या प्रचारातील संघर्षाचा फारसा परिणाम होणार नाही असे ठामपणे सांगितले. “काँग्रेसची ताकत दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रत्येक राज्यात त्यांचे आमदार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यांनी प्रासंगिकता गमावली आहे. त्यांच्या यात्रेचा काहीही परिणाम होत नाही कारण लोक ‘आप’ला भाजपा आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष असलेल्या राज्यांमध्ये एकमेव व्यवहार्य विरोधी पक्ष म्हणून पाहत आहेत.

आप मेक इंडिया नंबर वन  कार्यक्रमामुळे दुखावलेल्या काँग्रेसने देखील दावा केला आहे की केजरीवाल यांनी सुरू केलेल्या प्रचाराचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही. कारण राहुल यांनी आतापर्यंतचा त्यांचा सर्वात महत्वाकांक्षी राजकीय उपक्रम सुरू केला आहे. “आम्ही आमची राष्ट्रीय मोहीम कधी सुरू करणार आहोत हे आम्ही आधीच जाहीर केले.  आमची लढाई भाजपाशी आहे, ती भाजपसोबतच राहील, असे काँग्रेसचे खासदार आणि दिल्लीचे एआयसीसी प्रभारी शक्तीसिंह गोहिल म्हणाले.