काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा पूर्ण झाली. २९ जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंग फडकावत यात्रा पूर्ण झाल्याची घोषण करण्यात आली. यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी १३४ दिवस तामिळनाडू ते काश्मीर चालले. पण, केरळमधूनच राहुल गांधी यात्रा सोडण्याचा विचार करत होते, अशी माहिती राज्यसभा खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधींच्या गुडघ्याचं दुखणं वाढलं होतं. त्यामुळे राहुल गांधी केरळमधून यात्रेतील प्रवास थांबवण्याचा विचार करत होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. राहुल गांधींनी गुडघ्याचं दुखणं वाढल्याने यात्रेचं नेतृत्व एका वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवण्यात यावं, असं प्रियंका गांधींनी सांगितलं होतं, असं वेणुगोपाल म्हणाले.

हेही वाचा : नवे राज्यपाल कोण आहेत?

के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं की, “कन्याकुमारीतून यात्रा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही केरळ राज्यात प्रवेश केला. तिथे पोहचल्यावर राहुल गांधींनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की, माझ्या गुडघ्याचा त्रास वाढला आहे. माझ्याजागी अन्य नेत्याच्या नेतृत्वात यात्रा पुढं नेण्यात यावी, अशी सूचना केली होती.”

“नंतर राहुल गांधींच्या गुडघेदुखीबद्दल माहिती देण्यासाठी प्रियंका गांधींनी फोन केला होता. यात्रेची धुरा अन्य वरिष्ठ नेत्याकडं सोपण्यात यावं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. तेव्हा, देवाकडे राहुल गांधी बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती,” अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

हेही वाचा : “मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत हे देशाने मान्य केलं आहे आणि केवळ काँग्रेस…” अशोक गहलोत यांचं विधान!

“शेवटी फिजिओथेरपिस्टकडून उपचार घेतल्यानंतर राहुल गांधींच्या गुडघ्याचं दुखण बरं झालं. आणि ते पुन्हा यात्रेत सामील झाले,” असेही के. सी. वेणुगोपालांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi think quitting bharat jodo in keral say kc venugopal ssa
First published on: 12-02-2023 at 18:03 IST