राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृवाखाली काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचा व्हीप जारी केला आहे. सर्व आमदारांना काँग्रेसने उदयपूरमधील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. अश्यावेळी पक्षाचे राजस्थान विधानसभेतील मुख्य प्रतोद आणि गेहलोत यांचे अत्यंत निकटवर्तीय महेश जोशी अडचणीत आहेत. ते मुख्य प्रतोद असूनसुध्दा सध्या इतर आमदारांसोबत रिसॉर्टमध्ये नाहीत. महेश जोशी यांचा मुलगा रोहीत एका बलात्कार प्रकरणाील संशयीत आरोपी आहे. दिल्ली पोलीस रोहीत जोशी याच्या शोधात आहेत.जोशी यांच्या पत्नी या ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात आहेत. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजार टाळण्यासाठी जोशी यांनी निवडणूक आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली आहे. 

सध्या सुरू असलेल्या रिसॉर्ट राजकारणाविषयी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना महेश जोशी म्हणाले की ” माझ्या सारखे ५-१० आमदार इकडे तिकडे आहेत. पण त्यांची मते फुटणार नाहीत याची खात्री आहे. दिपेंद्र सिग, परसराम मोदरिया, भंवरलाल शर्मा आणि वेदप्रकाश शर्मा यांची तब्येत खराब आहे. ओमप्रकाश हडला हे उदयपूरमध्येच आहेत पण त्यांची तब्येत खराब आहे. माझी बायको ब्रेन हॅमरेजमुळे आयसीयूमध्ये आहे”.

सुभाष चंद्रा यांच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले की ” सुभाष चंद्रा हे अपक्ष उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर एकाही अपक्ष आमदाराची सही नाही. त्यांचे सर्व प्रस्तावक हे भाजपाचे आमदार आहेत. ते स्पष्टपणे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांना खुलेआम भाजपाचे उमेदवार म्हणून घेण्यास संकोच वाटत आहे का? सर्व गोष्टी दाराआड होता असल्यामुळे संशय निर्माण होतो. आम्ही आमच्याकडे १२६ मते असल्याचा दावा करतोय म्हणजे ती मते आमच्याकडे आहेत. भ्रष्टाचार आणि घोडेबाजार होऊ नये असे भाजपाने सांगावे असे आव्हान त्यांनी दिले आहे” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले की ” मी जरी तिथे नसलो तरी मी प्रक्रियेपासून दूर नाही. सर्व व्यवस्थापन करण्यात माझी महत्वाची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही आमदाराला मोबाईल बंद करण्यास संगीतले नाही. रिसॉर्ट बुक करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत तिथे गेलो होतो. तिथे नेटवर्कची समस्या आहे”. राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती रिसॉर्ट राजकारणाची. रिसॉर्ट राजकारणाच्या माध्यामातून राजकीय पक्षांना एकमेकांवर आरोप करण्यासाठी आयती संधीच मिळाली आहे.