राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आदेशानुसार ही नोटीस बजावली आहे. वारंवार आपली जागा सोडून घोषणाबाजी करणे, सदनाच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी ही नोटीस बजावत चौकशी करण्याचे आदेश राज्यसभा संसदीय समितीला दिले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि आपच्या खासदारांचा समावेश आहे.

राज्यसभेच्या संसदीय समितीने काढलेल्या आदेशात सांगितलं की, “अध्यक्षांनी खासदारांच्या गैरवर्तनामुळे हक्कभंग झाला आहे. सतत संसदेच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी करणे, कामकाजात अडथळा आणल्यामुळे अध्यक्षांना संसद स्थगित करावी लागली,” असेही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला गडचिरोलीत ‘मेडीगड्डा’चा अडथळा !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदाणी समूह प्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या ( जेपीसी ) चौकशीची मागणी करत संसदेत गोंधळ घातला. तसेच, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणाबाजी केली होती. तसेच, गोंधळाचा व्हिडीओ काढल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. १३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरु होणार असून, ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीला तेलंगणात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अटक; काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खासदारांना हक्कभंगाची नोटीस

संजय सिंग, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, नारनभाई जे राठवा, सय्यद नासिर हुसेन, कुमार केतकर, इम्रान प्रतापगढी, एल हनुमंथैया, फुलो देवी नेताम, जेबी माथेर हिशाम आणि रंजित रंजन यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे.