उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सात लाख कोटींचं अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्प सादर होत असताना समाजवादी पक्षाचे आमदार हे शेरवानीमध्ये आले होते. माजी मंत्री आझम खान यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी शेरवानीचा ड्रेसकोड पाळला होता. अखिलेश यादवही आज शेरवानी घालून सदनात आले होते. समाजवादी पार्टीचे आमदार सदनात माजी मंत्री आझम खान यांच्याविरोधात कारवाई झाली त्याचा निषेध म्हणून शेरवानी घालून आले होते. सपा आमदारांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की आम्हाला वाटलं म्हणून आम्ही शेरवानी घालून आलो.

सपा आमदार शहजिल इस्लाम यांनी सांगितलं की आज समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह सगळे नेते सदनात पोहचले. आम्ही सगळ्यांनी शेरवानी हा ड्रेसकोड ठरवला होता. आझम खान यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले आमच्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. आज आम्हाला या सदनात त्यांची कमतरता भासते आहे.

माजी मंत्री आझम खान यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं. त्यानंतर आज पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर झाला. समाजवादीचे नेते आता शेरवानी घालून अर्थसंकल्पात आले होते. अखिलेश यादव यांनीही शेरवानी घालून आले होते. अर्थसंकल्पाच्या दिवशी सपाचे सगळे आमदार शेरवानीत आल्याने त्यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं. योगी आदित्यनाथ यांना शेरवानी अजिबात आवडत नाही. त्यामुळेच जाणीवपूर्वक सगळे आमदार हे हटकून शेरवानी घालून आले होते. समाजवादीच्या एकाही नेत्याने याबाबत काही सविस्तर प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत सपाचे आमदार शहजील इस्लाम यांनी हे सांगितलं की आम्ही ड्रेस कोड ठरवला होता म्हणून आम्ही या ड्रेसकोडमध्ये आलो होतो. शेरवानी हे आमच्यासाठी एकोप्याचं प्रतीक आहे असंही इस्लाम यांनी सांगितलं.