भाजपाचे कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहित आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने कानपूरमधून माजी ज्येष्ठ पत्रकार रमेश अवस्थी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या या उमेदवारीनंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

सत्यदेव पचौरी यांनी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात, आगामी निवडणुकीतून माघार घेण्याच्या कारणाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. मात्र, भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा वयाचे कारण देऊन त्यांचे तिकीट कापण्याच्या तयारी होते. त्यापूर्वीच त्यांनी आगामी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांच्या विरोधात स्थानिक नेत्यांमध्येही नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष

खासदार होण्यापूर्वी सत्यदेव पचौरी हे कानपूरमधील गोविंदनगर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत. तसेच ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीही होते. २०१९ मध्ये भाजपाने कानपूरमधून मुरली मनोहर जोशी यांच्या जागी पचौरी यांना तिकीट दिले होते. मुरली मनोहर जोशींप्रमाणेच आता सत्यदेव पचौरी यांचाही समावेश मार्गदर्शक मंडळात केला जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यासंदर्भात बोलताना कानपूरमधील भाजपाचे नेते म्हणाले, “सत्यदेव पचौरी यांना तिकीट नाकारण्यामागे वय हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय कानपूरमधील भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे, खरं तर पचौरी यांना हे माहिती होते; त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलासाठी तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाने त्यांच्या मुलालाही तिकीट नाकारले.

२०२१ मध्ये सत्यदेव पचौरी यांच्यामुळे भाजपाला नाचक्कीचा सामनाही करावा लागला होता. करोना काळात झालेल्या मृत्यूनंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून मृतकांना वेळेवर उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असे म्हटले होते.

हेही वाचा – Loksabha Poll 2024 : संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या अनंतकुमार हेगडेंना डच्चू; भाजपातर्फे उत्तरा कन्नडमधून कोणाला संधी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सत्यदेव पचौरी यांनी संसदेत बोलताना अनेकदा देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही केली होती. देशात समान नागरी कायदा लागू केल्यास जनतेमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण होईल, असे ते म्हणाले होते. सत्यदेव पचौरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांशीही चांगले संबंध असल्याचे सांगितलं जातं.