महेश सरलष्कर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे ठाकरे गट व काँग्रेसमध्ये तीव्र झालेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. ‘आपल्याला मोदींच्या भाजपविरोधात लढायचे आहे की, सावरकरांविरोधात’, असा थेट प्रश्न पवारांनी राहुल गांधींना केल्याचे समजते.

Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान

राज्यसभेतील विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला सोनिया गांधी तसेच, राहुल गांधीही उपस्थित होते. ‘मी सावरकर नव्हे, गांधी आहे. मी माफी मागणार नाही’, या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद या बैठकीत उमटले. ठाकरे गटाच्या सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. ‘सावरकर हा अस्मितेचा प्रश्न असून त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशी भूमिका ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

हेही वाचा… सांगली बँकेच्या चौकशीची घोषणा ही जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याची खेळी ?

काँग्रेस व ठाकरे गट यांच्यातील मतभेद तीव्र झाले तर त्याचा फटका राज्यातील महाविकास आघाडी सरकारलाही बसू शकतो याची जाणीव पवारांनी बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांना करून दिली. संसदेत तसेच, संसदेबाहेरही आपण (विरोधक) मोदींच्या भाजपविरोधात लढत आहोत. आपले प्रमुख लक्ष्य भाजपचा पराभव करणे हेच असायला हवे. या उद्देशापासून विरोधकांनी दूर जाणे योग्य नाही, अशी समज पवारांनी दिल्याचे कळते. सोनिया गांधींच्या समक्ष पवारांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्यानंतर राहुल गांधी यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावर सबुरी दाखवण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जाते. पवारांची तडजोडीच्या भूमिकेशी सोनिया गांधीही सहमत असल्याचे समजते.

हेही वाचा… अशोक चव्हाण-जयप्रकाश दांडेगावकरांची साखर पेरणी

भाजपविरोधात लढण्याच्या व्यापक उद्देशाने विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांची राजकीय विचारसरणी वेगवेगळी आहे तरीही, आम्ही एकमेकांशी जुळवून घेत आहोत, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून मित्र पक्षांशी मतभेद तीव्र होणार नाहीत याची दक्षता काँग्रेसकडून घेतली जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे खरगे यांची भेट घेणार असून या बैठकीत मतभेदांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्या पक्षांतराची परंपरा सुरूच

लंडनमध्ये देशविरोधी विधाने केल्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत भाजपने संसदेमध्ये रान उठवले आहे. त्यावर, आपण सावरकर नाही असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. बडतर्फीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्या ठाकरे गटाने काँग्रेसला रोखठोक इशारा दिला. संसदेतील काँग्रेसच्या मोर्चातही ठाकरे गटाचे खासदार सहभागी झाले नव्हते. खरगेंच्या बैठकीकडेही पाठ फिरवली होती.