मोहन अटाळकर

अमरावती : पक्षचिन्‍ह आणि नावासाठी ठाकरे गटासमोर संघर्षाची स्थिती उद्भवली असताना गेल्‍या आठवड्यात शिवगर्जना अभियानाच्‍या माध्‍यमातून पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्‍याचा आणि कार्यकर्त्‍यांमध्‍ये चैतन्‍य निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न ठाकरे गटाकडून करण्‍यात आला. जिल्‍ह्यात खासदार नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांनाच ठाकरे गटाने लक्ष्य केले होते.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

 कार्यकर्त्‍यांपर्यंत आपली भूमिका पोहचवण्‍यासाठी आणि कार्यकर्त्‍यांची एकजूट करण्‍यासाठी ठाकरे गटाने शिवगर्जना अभियान राबवले आहे. अमरावती जिल्‍ह्यात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, उपनेत्‍या सुषमा अंधारे, शुभांगी पाटील यांच्‍या जाहीर सभा झाल्‍या. या सभेच्‍या माध्‍यमातून या नेत्‍यांनी भाजपवर प्रखर शब्‍दांत टीका केली. पण, भाजपला पाठिंबा देणारे राणा दाम्‍पत्‍य हे शत्रू क्रमांक एक ठरले.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपला खिंडार? दोन बडे नेते काँग्रेसच्या वाटेवर

उद्धव ठाकरे हे मुख्‍यमंत्री असताना राणा दाम्‍पत्‍याने त्‍यांच्‍यावर टीका करण्‍याची एकही संधी सोडली नाही. मुंबईतील मातोश्री या त्‍यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्‍याचा निर्णय राणा दांम्‍पत्‍याने जाहीर केल्‍यानंतर प्रसार माध्‍यमांचे लक्ष वेधून घेण्‍यात राणा यशस्‍वी ठरले, पण त्‍यात शिवसैनिक अधिकच आक्रमक झाल्‍याचे त्‍यावेळी पहायला मिळाले. शिवसैनिकांची ही शैली टिकवून ठेवण्‍याचे आव्‍हान ठाकरे गटासमोर असताना राज्‍यात सत्‍तांतर झाले आणि पुन्‍हा एकदा राणा दाम्‍पत्‍याने ठाकरे गटाला डिवचणे सुरू केले.

हेही वाचा >>> Maharashtra News Live: “वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

राणा दाम्‍ंपत्‍य आणि शिवसेनेतील संघर्ष जुना आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून २०१९ मध्‍ये नवनीत राणा या खासदार झाल्‍या. त्‍याआधी २०१४ मध्‍ये त्‍यांना अडसूळ यांनी पराभूत केले होते. अमरावती लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. बनावट जातप्रमाणपत्राच्‍या आधारे नवनीत राणा यांनी निवडणूक लढविल्‍याचा आरोप अडसूळ यांनी केला होता. हे प्रकरण सध्‍या न्‍यायप्रविष्‍ट आहे. आनंदराव अडसूळ हे शिंदे गटासोबत आहेत. त्‍यामुळे राणा दांम्‍पत्‍याच्‍या बाबतीत त्‍यांच्‍या विरोधाची धार कमी झाली असली, तरी इतर नेते मात्र हे प्रकरण विसरलेले नाहीत. त्‍यामुळे या विषयावरून राणा दाम्‍पत्‍याला कोंडीत पकडण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. शिवगर्जना अभियानातूनही तेच दिसून आले.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, ८० दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेता म्हणाला, “मला मोठा धडा मिळाला…”

सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्‍या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करून त्‍यांच्‍यावर जोरदार टीका केली. राणा यांच्‍याच बडनेरा मतदार संघातील सभेत त्‍यांनी नवनीत राणा यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द आणि सद्यस्थितीतील हिंदुत्‍पाची कास यातील विरोधाभास सांगितला. भाषणादरम्‍यान त्‍यांनी एक ध्‍वनिचित्रफित दाखवून नवनीत राणा या खासदार म्‍हणून अयशस्‍वी ठरल्‍या हे बिंबवण्‍याचा प्रयत्‍न केला. या शिवगर्जना अभियानातून कोणता परिणाम साधला गेला, हे निवडणुकीनंतरच स्‍पष्‍ट होणार आहे.