छत्रपती संभाजीनगर : दीड वर्षात कमालीच लोकप्रियता मिळवत राजकीय पटलावर पाय रोवण्याच्या तयारीत असणारे मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र आकाशदिव्यावर लावण्यात आले आहे. ‘ एक मराठा लाख मराठा’ ही आदाेलन काळातील लोकप्रिय घोषणाही दिव्यामध्ये उजळून जावी, असे आकाश कंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत.  मराठा आरक्षण आंदोलन आता राजकीय व्यासपीठावर आल्याने जरांगे यांची लोकप्रियता पारंपरिक दिवाळीच्या सणापर्यंत पोहचली आहे.

शिवसेना फुटीनंतर ‘ पन्नास खोके एकदम ओके’ हे घोषवाक्यही असेच लोकप्रिय झाले होते. अगदी हे घोषवाक्य रांगोळीतून काढण्यापर्यंतची लोकप्रियता त्यास मिळाली होती. आता ‘ एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा आकाशकंदीलावर उमटली आहे. आरक्षण आंदोलनातील जरांगे नेता झाल्यानंतर त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या नेत्यांची रिघ लागली आहे. छत्रपती संभाजीराजे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतेच त्यांची भेट घेतली. प्रत्येक मतदारसंघात एकवटलेला मराठा मतपेढी घडवणारा नेता अशी जरांगे यांची लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झाली. गोदापट्ट्यातील १२८ गावातून ‘मराठा आरक्षण ’ आंदोलनाचे प्रतीक म्हणून या पूर्वी ‘ जेसीबी’ दिसत असे. या १२८ गावातील प्रभाव मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जाणवला. या मतदारसंघातून ‘ भाजप’ चा पराभव व्हावा असे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीस विरोधी मोहिमेला धार दिली असताना सत्ताधारी गटातील नेते आवर्जून जरांगे यांची भेट घेत आहेत.

हेही वाचा >>>राज्याच्या राजकारणात वजन असलेल्या माणिकराव ठाकरे यांच्यापुढे दिग्रस मतदारसंघात आव्हानांचे डोंगर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा मतांचा प्रभाव १२० मतदारसंघात आहे तर आरक्षित मतदारसंघातील मराठा मतपेढी काही आमदारांच्या पाठिशी उभे करू, असा मानस व्यक्त करुन काही मोजक्या मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी मनोज जरांगे यांनी सुरू केली आहे. अशा काळात दीपावलीच्या आकाशदिव्यांवर जरांगे झळकू लागले आहेत.