राजेश्वर ठाकरे

नागपूर : काँगेस नेते राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेकरिता विदर्भतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो नागरिकाचे जत्थे शेगांवकडे जात असल्याचे महामार्गावर दिसून येत आहेत. दरम्यान सुरक्षेची उपाययोजना म्हणून पोलिसांनी ठीक ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी अंती वाहने सोडली जात आहेत.

हेही वाचा… घराणेशाही करणाऱ्या खडसे-महाजनांमध्ये घराणेशाहीवरून कलगीतुरा

भारत जोडो यात्रेच्या एका पडावात बुलडाणा जिल्यातील शेगाव या विदर्भातील तीर्थस्ळी राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्या सभेसाठी विदर्भातील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मोठया संख्येने शुक्रवारी सकाळी कार, खासगी वाहनाने शेगाव कडे निघाले. याशिवाय काँग्रेस पक्षाशी संबंध नसलेले इतरही नागरिकराहुल गांधी यांच्या या सभेचे साक्षीदार होण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे शेगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर यात्रेकरूंचे जत्थे दिसून येत आहेत.

हेही वाचा… विरोधकांनी सावरकर मुद्द्यावर चर्चेसाठी समोर येण्याचे बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे स्टाईल निषेध करण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर नागपूरसह विदर्भातील मनसैनिक शेगावच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजप आणि मनसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच मनसेने राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नागपुरातून शुक्रवारी सकाळी ७ वाजता मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत. अमरावती, अकोला, खामगाव असा प्रवास करत ते शेगावला पोहोचणार आहे, मनसेच्या शहराध्यक्षांनी दिली.