संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या नऊ वर्षांत सरकारने केलेल्या योजनांचा आढावा घेतानाच काँग्रेस, नेहरू-गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं असून त्यांनी पुन्हा राहुल गांधींचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “जे बोललो ते केलं, ५ वर्षांचं प्रगतिपुस्तक घेऊन आलोय”, जेपी नड्डा यांनी जारी केला भाजपाचा त्रिपुरा निवडणुकीचा जाहीरनामा

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

आपण सर्वांनीच पंतप्रधान मोदींचं संसदेतील दीड तासांचं भाषण ऐकलं. मात्र, दुर्देवाने त्याला कोणताही अर्थ नव्हता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान मोदींनी दिली नाही, अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींच्या भाषणाचं कौतुकही केलं. राहुल गांधींचं संसदेतील भाषण हे आजपर्यंतच्या भाषणांपैकी एक होतं, असं ते म्हणाले.

हेही वाचा – हरियाणात दोन वर्षांपासूनची सर्व रिक्त पदं रद्द होणार, मनोहरलाल खट्टर सरकारचा मोठा निर्णय; विरोधक आक्रमक!

सिन्हांकडून यापूर्वी ‘भारत जोडो’चं कौतुक

शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही अनेदा राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. भारत जोडो यात्रेबाबत बोलताना मागील काही वर्षांत निघालेली ही ऐतिहासिक यात्रा असल्याचे सिन्हा यांनी म्हटलं होतं. “राहुल गांधींची तीन हजार ५७० किलोमीटरची भारत जोडो यात्रा मागील काही दिवसांत निघालेल्या ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे. या यात्रेची तुलना तुम्ही १९९०च्या दशकाच्या निघालेल्या लालकृष्ण अडवाणींच्या ‘रामरथ’ यात्रेशी करू शकता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच राहुल गांधी आपले नेतृत्व सिद्ध करत आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीत ते पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील”, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा – “…तर नरेंद्र मोदींनी चौकशीचे आदेश द्यावेत,” गौतम अदाणी प्रकरणावर महुआ मोईत्रांचे टीकास्र

दरम्यान, राहुल गांधी यांच्या वारंवार केलेल्या कौतुकानंतर शत्रुघ्न सिन्हा पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सध्या रंगू लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc mp shatrughan sinha praises rahul gandhi again on parliament speech criticized narendra modi spb
First published on: 10-02-2023 at 11:03 IST