उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या दोन जागांसाठी ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे इतर पक्षांची कोंडी झाली आहे. समाजवादी पक्षाने २८ वर्षीय कीर्ती कोल यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्ष कोल यांच्या माध्यमातून आदिवासी व्यक्तीला उमेदवारी दिल्याची भूमिका मदत आहे.किर्ती कोल या अनुसूचित जातीच्या आहेत आणि सध्या मिर्झापूर जिल्ह्यातील जिल्हा पंचायत सदस्य आहेत.

विधानसभेत बहुमत मिळाल्याने विधान परिषदेतील सभागृहातील दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास भाजपाला आहे.  भाजपाने त्यांच्या काशी प्रदेश उपाध्यक्षा निर्मला पासवान आणि गोरखपूर प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सिंह सैंतवार यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाच्या इतर जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

कीर्ती कोल यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर एका निवेदनात समाजवादी पक्षाने म्हटले आहे की “आदिवासी समुदायाचे  प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला दिलेली उमेदवारी संविधान आणि लोकशाहीचा आत्मा मजबूत करेल.” समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, “कीर्ती कोल या आदिवासी समाजातून आल्या आहेत. आदिवासी समाजाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे अशी पक्षाची इच्छा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले होते, पण त्यांचा पराभव झाला. आता पक्षाने त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाच्या आदिवासी समाजातून असलेल्या उमेदवाराला भाजपच्या आमदारांसह सर्व आमदारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एका राखीव जागेवरून अपना दल (सोनेलाल) चे राहुल प्रकाश कोल यांच्याकडून  कीर्ती कोल या पराभूत झाल्या होत्या. कीर्ती कोल या एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील, माजी बसप खासदार दिवंगत भाई लाल कोल, दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते . त्यांनी एकदा भाजपच्या तिकिटावर आणि नंतर सपा चिन्हावर निवडणूक लढवली होती.