नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. हरियाणामधील जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याबाबत ईडीने सलग तीन दिवस रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावले होते. अशाप्रकारे काँग्रेसवर एकावर एक संकटं येत असताना पक्ष नेतृत्वांनी मात्र मौन बाळगलं आहे. सत्ताधारी भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी ही दोन्ही प्रकरणं बाहेर काढली असल्याचं बोललं जात आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ९ एप्रिलला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ही बातमी पसरताच पक्ष नेतृत्वाने स्वत:चा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय एजन्सीने केलेल्या या कारवाईला त्यांनी सूडाचे राजकारण असे म्हटले आहे.
काँग्रेस वाड्रांना मदत करणार नाहीच
वाड्रा यांचा बचाव न करणं आणि पक्षाने त्यांच्यापासून लांब राहणं हा एक विचारपूर्वक निर्णय असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याचं कारण म्हणजे पक्षात त्यांना कुठलंही पद नाही आणि त्यांची कधीही कुठल्या औपचारिक पदावर निवड झालेली नाही. वाड्रा यांनी राजकारणात येण्याची तयारी दर्शवल्यानंतर काही दिवसांतच १५ एप्रिलला ईडीने वाड्रा यांना समन्स बजावले. यावर काँग्रेसने मौन बाळगण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसते.
वाड्रा यांच्याविरुद्धचा खटला स्कायलाईट हॉस्पिटलशी संबंधित आहे. वाड्रा याआधी स्कायलाईटचे संचालक होते. प्रसिद्ध डीएलएफ कंपनी आणि स्कायलाईट यांच्यातील जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे. हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये हे प्रकरण उघडकीस आणले. मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील हरियाणातील तत्कालीन काँग्रेस सरकारने वाड्रा यांना पाठीशी घातल्याचे आरोप आहेत. वाड्रा यांनी त्यांना सत्यावर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल असे यावेळी म्हटले आहे. ईडीने बजावलेल्या या समन्सला त्यांनी राजकीय सूड म्हटले आहे. मात्र, काँग्रेसने याबाबत मौन बाळगलं आहे. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी वाड्रा यांच्या पत्नी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलं.
वाड्रा यांची प्रतिक्रिया
ईडी चौकशीच्या पहिल्या दिवशी वाड्रा म्हणाले की, “जेव्हा लोकांच्या बाजूने, अल्पसंख्याकांसाठी आणि सरकारच्या अपयशाबाबत बोलतो तेव्हा अडवलं जातं. हा राजकीय सूड आहे, लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मी राजकारणात यावे असे मला वाटतं. जेव्हा मी राजकारणात येण्याची तयारी दर्शवतो तेव्हा मला खेचण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांसाठी दूर ठेवण्यासाठी जुने मुद्दे बाहेर काढले जातात.” यापूर्वीही वाड्रा यांनी राजकारणात येण्याविषयी वक्तव्य केले होते. “लोक मला नेहमीच संसदेत जाण्याबाबत विचारतात. मी कठोर परिश्रम करेन. जेव्हा काँग्रेसला गरज पडेल तेव्हा माझ्या कुटुंबाचा आशीर्वाद असेलच, असं वाड्रा म्हणाले होते.
रॉबर्ट वाड्रा यांना स्वत:चा बचाव स्वत:लाच करायचा आहे अशी परिस्थिती सध्या आहे. संपूर्ण काँग्रेस नेतृत्वाचे लक्ष नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाचा सक्रियपणे बचाव करण्याकडे लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तात्काळ बैठकही बोलावली. सरकारने ज्याप्रकारे नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला लक्ष्य केले आहे, त्याविरूद्ध मोहिमेवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारींसोबत ही बैठक बोलावली गेली. गेल्या वर्षी हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपाने याच जमिनीच्या व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हादेखील काँग्रेस अशा पेचात सापडली होती. निवडणूक प्रचारादरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाड्रा आणि काँग्रेसवर टीका केली होती. २००४ ते २०१४ पर्यंत हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राज्य जावई आणि मध्यस्थांच्या हाती सोपवल्याची टीका भाजपाने केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसने वाड्रा यांना कायम दूर ठेवले, त्यामुळे त्यांनी स्वत:चे रक्षण केल्याचे दिसते. वाड्रा हे कोणत्याही प्रकारे पक्षाशी संबंधित नाहीत, असं काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं.
असं असताना भाजपाने अनेक वर्षांपासून वाड्रा यांच्यावर टीका केली आहेच. हरियाणातील पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने एप्रिल २०२३ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सांगितले की, “स्कायलाईट हॉस्पिटलने गुरूग्राममधील डीएलएफ कंपनीला जमीन हस्तांतरित करताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेलं नाही आणि अशा प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा होत नाही.”
भाजपाचे लक्ष्य काँग्रेस
भाजपा फक्त वाद उकरण्याचा प्रयत्न करत आले आहेत, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. “त्यांना माहीत आहे की वाड्रा यांना तीन दिवस ईडी कार्यालयात ठेवल्याने ते बातम्यांमध्ये राहतील आणि जनतेला असं वाटंल की, वाड्रा हे काँग्रेसशी संबंधित आहेत. गांधी कुटुंबाशी वाड्रा यांचा असलेला संबंध बदलू तर शकत नाहीच, मात्र याचा अर्थ असा नाही की जेव्हा कधी एजन्सी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावेल तेव्हा काँग्रेसला प्रतिक्रिया द्यावी लागेल, असं हरियाणा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं.
“कायद्याला त्याचे काम करू द्या, आरोप काहीही असोत, वाड्रा यांच्यावरील आरोपांमध्ये किंचितही तथ्य नाही. भाजपाला हे माहीत आहे, मात्र ते फक्त खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करायचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि वाड्रा यांच्यावरील आरोप दोन्ही एकाच रणनीतीचा भाग आहेत, असं एका काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “वाड्रा यांचे समर्थन करणे आणि त्यांना पक्षात सामील करून घेणे हे स्वध्येय असेल. राहुल गांधी आदर्श आणि जातीच्या प्रतिनिधित्वाबाबत बोलताना वाड्रा यांना पक्षात आणणं म्हणजे भाजपाकडून घराणशेहीच्या राजकारणाबाबत खडेबोल ऐकून घेणं, म्हणूनच आमच्या पक्षाने जुन्या प्रकरणात ईडी चौकशीच्या दरम्यान वाड्रा यांचे समर्थन न करण्याचा निर्णय घेतला आहे.”
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या अधिग्रहणाशी संबंधित आहे. या प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याही नावाचा समावेश आहे. हरियाणाच्या शिकोहपूर येथील जमीन व्यवहारातील कथित अनियमितते प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी ईडी करत आहे.