वसई/ पालघर: लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने लढविण्याची घोषणा केली असून प्रचाराला सुरवात केली आहे. मागील निवडणुकीत बविआसोबत असलेले डाव्या पक्षे यंदा मात्र महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे डाव्यांच्या निर्णायक मतांचा फटका हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला बसणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने कॉंग्रेस आघाडी तसेच डाव्या पक्षांच्या साथीने निवडणूक लढवली होती. यंदा कुणाला समर्थन न देता यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रणनिती ठरविताना मागील निवडणुकीत पडलेल्या मतांच्या गणितांची जुळवाजुळव सुरू आहे.

हेही वाचा – कन्हैया कुमारला काँग्रेसने बिहारऐवजी दिल्लीतूनच उमेदवारी का दिली?

पालघर हा आदिवासी जिल्हा असून आदिवासींची मते निर्णायक आहेत. त्यातही डहाणूमध्ये माकपचं वर्चस्व आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला होता, तरीदेखील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा ७८ हजार ८८३ मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणूक बहुजन विकास आघाडीने लढविण्याची घोषणा केली असून प्रचाराला सुरवात केली आहे. मागील निवडणुकीत बविआसोबत असलेले डावे पक्षे यंदा मात्र महाविकास आघाडीसोबत राहणार आहेत. त्यामुळे या मतांचा फटका बविआला बसण्याची शक्यता असून कम्युनिस्ट पक्षांची ९० हजार ते एक लाख मतं डाव्यांच्या निर्णायक ठरणार आहेत.

सन २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सर्व निवडणुकांमध्ये आपला उमेदवार रिंगणात उतरविला होता. त्यापूर्वी डहाणू लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पक्षांचे खासदार निवडून आले होते. सन २००९ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे लहानू कोम यांना ९२ हजार २२४ मते, सन २०१४ मध्ये लाडक्या खरपडे यांना ७६ हजार ८९० मते व २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत याच पक्षातर्फे निवडणूक लढवणाऱ्या किरण गहला यांना ७१ हजार ८८७ मते प्राप्त झाली होती.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे डहाणू विधानसभा क्षेत्र ४० ते ५५ हजार मते, विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार मते मिळवल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे. तसेच बोईसर व पालघर विधानसभा क्षेत्र पाच ते सात हजार मतं डाव्या आघाडीला मिळतात. माकपाचा अजूनही डहाणू व विक्रमगड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाव कायम असून डहाणूचे आमदार विनोद निकोले कार्यरत आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने कॉंग्रेस आघाडी तसेच डाव्या पक्षांच्या साथीने निवडणूक लढवली होती. त्या आधारावर बळीराम जाधव यांनी राजेंद्र गावित यांच्यावर डहाणूमधून ८१४७ व विक्रमगडमधून ५७५४ चे मताधिक्य घेणे शक्य झाले होते. यंदा बहुजन विकास आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी रणनिती ठरविताना मागील निवडणुकीत पडलेल्या मतांच्या गणितांची जुळवाजुळव सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या बोईसर (पास्थळ) येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत माकपाचे वरिष्ठ नेते डॉ. अशोक ढवळे स्वतः जातीने उपस्थित होते. याशिवाय उपस्थित जमावांमध्ये ४० ते ५० टक्के नागरीक लाल बावटा घेऊन आले असल्याचे जाणविले. या प्रचार सभेत डॉ. अशोक ढवळे यांनी केंद्र सरकार व त्यांच्या ध्येय धोरणाविरुद्ध तसेच भाजपाच्या धनिक धार्जिण्य, भ्रष्टाचारी व हुकूमशाह पद्धतीचा समाचार घेतला होता. विशेष म्हणजे आपल्या भाषणादरम्यान डॉ. ढवळे तसेच आमदार विनोद निकोले यांनी बहुजन विकास आघाडीशी यापूर्वी असलेल्या संबंधाविषयी भाष्य करण्याचे टाळले. यापुढे जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा इरादा स्पष्ट केल्याने आगामी निवडणूक डाव्यांची साथ बहुजन विकास आघाडीला लाभेल याची शक्यता नाही.

हेही वाचा – मतदानात महिला पुढे; मग उमेदवारीत मागे का? महिलांना उमेदवारी देण्यात केरळमधील राजकीय पक्षांच्या उदासीनतेचे कारण काय?

मागील निवडणुकीत बविआला चार लाख ९१ हजार मते मिळाली होती. या मतांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात डाव्यांच्या लाखभर मतांचा समावेश असण्याची शक्याता वर्तवली जात आहे. ही मते बविआला मिळणार नसल्याचे स्पष्ट असले तरीही बविआला ते मान्य नाही.

याबाबत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले की, आमच्या पाठिंबव्यावर डहाणू आणि विक्रमगडचे आमदार निवडून जातात. तेथे आमची ताकद आहे. त्यामुळे डावे जरी महाविकास आघाडीकडे असले तरी आम्हाला फारसा फरक पडणार नाही. आता जरी डावे महाविकास आघाडीकडे असले तर प्रत्यक्षात त्यांची सर्व मते महाविकास आघाडीला मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.