जून महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशचे आमदार अब्बास अन्सारी यांना तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राज्य विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आले. गेल्या वर्षी बांदा तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या गुंड राजकारणी मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास हा ओम प्रकाश राजभर यांच्या नेतृत्वाखालील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचा आमदार होता. ते आधी समाजवादी पक्षाचे सहयोगी होते. मात्र, आता ते सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२२ च्या निवडणुकीनंतर विधानसभा स्थापन झाल्यापासून अब्बास यांच्या अपात्रतेनंतर ४०३ सदस्यांच्या यूपी सभागृहात सहा जण अपात्र ठरल्याची नोंद झाली आहे. २०२२ पासून अपात्र ठरलेल्या इतर आमदारांमध्ये सपाचे तीन आणि भाजपाचे दोन आमदार आहेत.

२०१७ ते २०२२ या यूपी विधानसभेच्या पूर्ण पाच वर्षांच्या काळात एकूण चार आमदारांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामध्ये भाजपाच्या तीन आणि सपाच्या एका आमदाराचा समावेश होता. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम ८ अंतर्गत खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवले जाते. त्यामध्ये काही प्रकरणांमध्ये दोषींना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. तसेच दोन किंवा त्याहून अधिक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषींना अपात्र ठरविले जाणे समाविष्ट आहे. प्रमुख विरोधी पक्ष सपाने त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला सूडाचे राजकारण म्हटले आहे; तर भाजपाने न्यायालयीन खटले आणि दोषी सिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपात्रतेची कारवाई झाल्याचे दाखवून दिले आहे.

“भाजपा सरकारच्या सत्तेच्या अहंकारामुळे हे आमच्या नेत्यांविरूद्ध सtडाचे राजकारण करण्याशिवाय दुसरे काहीही नाही हा सत्तेचा उघडपणे गैरवापर आहे”, असे सपाचे प्रवक्ते व लोकसभा खासदार राजीव राय इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटले, “अपात्रतेची कारवाई योग्य प्रक्रियेनंतर झाली आहे. न्यायालयांनी दोषी ठरविल्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई झाली आहे, असे प्रश्न उपस्थित करीत आहेत याचा अर्थ सपाला आपल्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का?”

२०२२ पासून राज्यातील सहा आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. ते नेमके कोण आहेत आणि त्यांना का अपात्र ठरविण्यात आले, ते जाणून घेऊ…

आझम खान (समाजवादी पार्टी), रामपूर सदर

२०१७ मध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून माजी सपा मंत्री यांना अनेक खटल्यांचा सामना करावा लागला आहे. रामपूरमध्ये खान यांच्यावर जमीन बळकावण्याचा, फसवणूक व गुन्हेगारी, अतिक्रमण यांसह इतर ८७ गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम खान हे सहआरोपी आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये २०१९ च्या द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर खान यांनी त्यांचे विधानसभा सदस्यत्व गमावले. निवडणूक अधिकारी अनिल कुमार चौहान यांच्या तक्रारीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यांनी मिलक विधानसभा मतदारसंघात भाषण देताना खान यांनी संविधानिक पदांवर असलेल्या लोकांसाठी अपशब्द वापरले, त्यांना धमकावले आणि दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. खान यांच्याविरुद्ध एप्रिल २०१९ मध्ये आयपीसी कलम १५२ अ (वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५ (१) (कोणतेही विधान, अफवा किंवा अहवाल प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे), तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (निवडणुकांच्या संदर्भात वर्गांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता.
खान यांनी हे भाषण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले गेले होते जेव्हा बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांनी युती करून निवडणूक लढवली होती.
पोटनिवडणूक : खान यांच्या जागेसाठीची पोटनिवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये झाली आणि त्यात त्यांचे दीर्घकाळापासूनचे प्रतिस्पर्धी भाजपाचे आकाश सक्सेना यांनी विजय मिळवला होता. सक्सेना यांनी खान यांचे विश्वासू व सपा उमेदवार असीम राजा यांचा ३३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

विक्रम सैनी (भाजपा), खतौली

नोव्हेंबर २०२२ मध्ये २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधित एखाद्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर एका महिन्याने सैनी यांना अपात्र ठरविण्यात आले. राष्ट्रीय लोक दलप्रमुख जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांना पत्र लिहून सपाचे आमदार आझम खान यांच्या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्यात आली. तर दोषी आमदाराची जागा अद्याप रिक्त म्हणून का घोषित करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर सैनी यांना अपात्र ठरविण्यात आले.

सैनी यांच्यासह एकूण ११ जणांना दंगल, प्राणघातक शस्त्रांनी सज्ज दंगल, इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे व धमकावणे या आरोपांखाली दोषी ठरविण्यात आले.
पोटनिवडणूक : डिसेंबर २०२२ च्या पोटनिवडणुकीत सपाच्या पाठिंब्याने आरएलडीचे उमेदवार मदन भैय्या यांनी सैनी यांच्या पत्नी व भाजपा उमेदवार राजकुमारी सैनी यांचा २२ हजार १४३ पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

आमदारांवर नेमके कोणते गुन्हे दाखल?

  • सार्वजनिकरित्या प्रक्षोभक भाषणे करणे
  • जमीन बळकावणे, फसवणूक आणि अतिक्रमण
  • बलात्काराचा प्रयत्न आणि फसवणूक
  • सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे
  • प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी देणे

अब्दुल्ला आझम खान (सपा), सुअर

फेब्रुवारी २०२३ मध्ये अब्दुल्ला आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यांना १५ वर्षे जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामध्ये अब्दुल्ला आणि त्यांच्या वडिलांवर पोलिसांनी मुरादाबादमध्ये तपासणीसाठी वाहन थांबविल्यानंतर वाहतूक रोखल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सात जवान आणि एका रिक्षाचालकाचा यात मृत्यू झाला होता.
न्यायालयाने दोघांनाही आयपीसी कलम ३४१ (चुकीचा प्रतिबंध) आणि ३५३ (सरकारी सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे) आणि फौजदारी कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. अब्दुल्ला यांना विधानसभेतून दुसऱ्यांदा अपात्र ठरविण्यात आले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द केल्यानंतर २०२० मध्ये त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
पोटनिवडणूक : मे २०२३ च्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपा सहयोगी अपना दलचे उमेदवार शफीक अहमद अन्सारी यांनी सपाच्या अनुराधा चौहान यांच्याविरुद्ध आठ हजार ७२४ मतांनी जिंकली होती.

रामदुलार गोंड (भाजपा), दुधी

डिसेंबर २०२३ मध्ये भाजपा आमदार रामदुलार गोंड यांना सोनभद्र जिल्हा न्यायालयाने २०१४ मध्ये १५ वर्षांच्या मुलीशी संबंधित बलात्कार प्रकरणात २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर अपात्र ठरविण्यात आले. त्यांना बलात्कार, पुरावे गायब करण्यास कारणीभूत ठरणे आणि खोटी माहिती दणे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली दोषी ठरविण्यात आले. नऊ वर्षांहून अधिक काळ आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून खटला मागे घेण्यासाठी खूप दबाव आणि धमकीचा सामना करावा लागल्याचे आरोप पीडितेच्या कुटुंबाने केले.
पोटनिवडणूक : जून २०२४ मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली. ती निवडणूक सपाचे विजय कुमार सिंह यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सरवण कुमार यांच्याविरुद्ध तीन हजार २०८ मतांनी जिंकली.

इरफान सोलंकी (सपा), शिशामाऊ

जून २०२४ मधअये सोलंकी यांचा धाकटा भाऊ रिझवान आणि इतर तिघांना २०२२ मध्ये कानपूरच्या जाजमाऊ परिसरात एका महिलेचा छळ केल्याच्या आणि तिची जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात तिचे घर जाळल्याच्या आरोपाखाली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. चार वेळा आमदार राहिलेल्या सोलंकी यांना २०२२ पासून आठ प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानंतर सोलंकी यांना विधानसभेतून अपात्र ठरविण्यात आले.
पोटनिवडणूक : नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत इरफान सोलंकी यांच्या पत्नी, सपाचे उमेदवार नसीम सोलंकी यांनी सिसमौ मतदारसंघातून भाजपाचे सुरेश अवस्थी यांचा आठ हजार ५६४ मतांनी पराभव केला.

अब्बास अन्सारी (एसबीएसपी), मऊ सदर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून २०२५ मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त भाषणाच्या प्रकरणात अब्बास अन्सारी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात आले. मऊ सदरमधून एसबीएसपीच्या तिकिटावर निवडून आलेले अब्बास यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एका जाहीर सभेत हे विधान केले होते.
अब्बास यांच्याविरुद्ध एका पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, मार्च २०२२ मध्ये त्यांनी काही कॉन्स्टेबलसह अब्बास आणि त्यांचा भाऊ उमर अन्सारी यांना एका मंचावरून १५० लोकांच्या गर्दीला संबोधित करताना आणि निवडणुकीनंतर मऊच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची धमकी देताना पाहिले होते. ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते.
पोटनिवडणूक : निवडणूक आयोगाने अद्याप या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही