आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या ‘मफलर’साठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा राजकीय कार्यक्रमात मफलर परिधान करून उपस्थित राहतात. त्यामुळे ‘मफलर’ ही त्यांची एकप्रकारे ओळख बनली आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मंगळवारी एका महिलेनं “सर, तुम्ही मफलर का घातला नाही?” असा प्रश्न केजरीवालांना विचारला. यावर केजरीवालांनीही हसत उत्तर दिलं आहे. दिल्ली महापालिकेच्या प्रचारादरम्यान घडलेला हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी केजरीवालांनी मफलरबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलेसोबत सेल्फीही काढला.

हेही वाचा- “भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, मंगळवारी अरविंद केजरीवाल दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चिराग गल्ली परिसरात गेले होते. यावेळी गल्लीतून जात असताना एका महिलेनं “सर, तुमचा मफलर कुठे आहे?” असा प्रश्न विचारला. यावर केजरीवालांनी “अजून थंडी सुरू झाली नाही” असा हसून प्रतिसाद दिला. यानंतर त्यांनी संबंधित महिलेसोबत सेल्फीही काढला. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश

या व्हायरल व्हिडिओमध्ये, अरविंद केजरीवाल आपल्या काही स्थानिक नेत्यांसमवेत एमसीडी निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार करत आहेत. ते परिसरातील रहिवाशांशी संवाद साधत आहेत.