"सर, तुम्ही मफलर का घातला नाही?" महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल | woman asked cm aravind kejriwal sir why arent you wearing muffler viral video rmm 97 | Loksatta

“सर, तुम्ही मफलर का घातला नाही?” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल

आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या ‘मफलर’साठी प्रसिद्ध आहेत.

“सर, तुम्ही मफलर का घातला नाही?” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल
Photo- Screengrab/india today

आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या ‘मफलर’साठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा राजकीय कार्यक्रमात मफलर परिधान करून उपस्थित राहतात. त्यामुळे ‘मफलर’ ही त्यांची एकप्रकारे ओळख बनली आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मंगळवारी एका महिलेनं “सर, तुम्ही मफलर का घातला नाही?” असा प्रश्न केजरीवालांना विचारला. यावर केजरीवालांनीही हसत उत्तर दिलं आहे. दिल्ली महापालिकेच्या प्रचारादरम्यान घडलेला हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी केजरीवालांनी मफलरबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलेसोबत सेल्फीही काढला.

हेही वाचा- “भाजपा आणि RSSचे नेते आंबेडकरांसमोर हात जोडतात, नंतर पाठीत वार करतात” राहुल गांधींचं टीकास्र!

खरं तर, मंगळवारी अरविंद केजरीवाल दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी चिराग गल्ली परिसरात गेले होते. यावेळी गल्लीतून जात असताना एका महिलेनं “सर, तुमचा मफलर कुठे आहे?” असा प्रश्न विचारला. यावर केजरीवालांनी “अजून थंडी सुरू झाली नाही” असा हसून प्रतिसाद दिला. यानंतर त्यांनी संबंधित महिलेसोबत सेल्फीही काढला. हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश

या व्हायरल व्हिडिओमध्ये, अरविंद केजरीवाल आपल्या काही स्थानिक नेत्यांसमवेत एमसीडी निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार करत आहेत. ते परिसरातील रहिवाशांशी संवाद साधत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 18:19 IST
Next Story
Gujarat Election 2022 : सोशल मीडियावरील प्रचारात भाजपा पिछाडीवर! आप सर्वांत पुढे; काँग्रेसचे प्राधान्य ‘भारत जोडो यात्रे’ला