News Flash

शाळेत न येण्याची शिक्षा दिल्याने १० वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा नंबर दोनमध्ये शिकणाऱ्या शुभम सुरवाडेचे चित्रकलेचे पुस्तक फाडण्यावरुन मित्राशी वाद झाला.

देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा नंबर दोनमध्ये शिकणाऱ्या शुभम सुरवाडेचे चित्रकलेचे पुस्तक फाडण्यावरुन मित्राशी वाद झाला.

शाळेत वर्गमित्राशी वाद झाल्यानंतर शिक्षकांनी पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिल्याने देहूरोड येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दगड खाणीत उडी मारुन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय शाळा नंबर दोनमध्ये शिकणाऱ्या शुभम सुरवाडेचे चित्रकलेचे पुस्तक फाडण्यावरुन मित्राशी वाद झाला. यानंतर शाळेतील शिक्षकांनी शुभमला पाच दिवस शाळेत न येण्याची शिक्षा दिली होती. यामुळे शुभम निराश होता. मंगळवारी संध्याकाळी शुभम विठ्ठलनगरच्या दगडी खाणीकडे जातो असे सांगून घरातून निघाला. बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

शुभमने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहीली असून यात त्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. ‘वर्गमित्राने माझे चित्रकलेचे पुस्तक फाडले. यावरुन वाद झाला होता. शिक्षकांनी माझ्यासह चार जणांना स्टाफ रुमच्या बाहेर बसवून ठेवले. वर्गातील बाकीची मुलंही शिक्षकांशी खोटं बोलली आहेत. शिक्षकांमुळेच मी टोकाचे पाऊल उचलत आहे’, असे शुभमने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  दगडखाणीत पाणी भरले असून एनडीआरएफच्या पथकाला बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 10:14 am

Web Title: 10 th standard boy committed suicide in dehuroad
Next Stories
1 दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
2 पुणे-सातारा रोडवरील हॉटेलमध्ये आग, अग्निशमन जवानासह चार जण जखमी
3 यंदाच्या वारीत पर्यावरणाचीही भक्ती!
Just Now!
X