पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १४७ रुग्ण आढळल्याने १ लाख ५९ हजार ८४५ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४१० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४९ हजार २८० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १९१ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ८६ हजार ९२४ वर पोहचली असून पैकी ८३ हजार २०९ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.