News Flash

औंधमध्ये कोयत्याने १० वेळा वार करुन दुध व्यावसायिकाची हत्या

हल्ला करणारा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

औंधमधील कस्तुरबा वसाहतीत दुध टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. रोहित जुनवणे (वय २८) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणातील संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.

रोहित जुनवणे याचा दुधाचा व्यवसाय असून गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे वसाहतीत दुध टाकण्यासाठी गेला होता. रोहित वसाहतीत येताच दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याला गाठले. त्यांनी रोहितवर कोयत्याने १० वेळा सपासप वार केले. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर पळून गेले. स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रोहित दिसताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हल्ला करणारा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 11:00 am

Web Title: 28 year old murdered in aundh
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग
2 लोकसभेसाठी कलमाडींचा विचार शक्य
3 पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांकडून ‘माउंट मेरा’ हिमशिखरावर तिरंगा
Just Now!
X