पुणे शहरात दिवसभरात ४२६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६८ हजार ३० इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४४६ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५८ हजार ३१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २५५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ८८ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार २८४ वर पोहचली असून पैकी ८७ हजार ५४९ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८०७ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.