26 November 2020

News Flash

पुण्यात चोवीस तासात करोनाचे ४४३ नवे रुग्ण तर पिंपरीत १९२ रुग्ण

पुण्यात चार तर पिंपरीत पाच जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात ४४३ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६६ हजार ६५२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४२१ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २४६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५७ हजार ४१० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १९२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९० हजार ४८१ वर पोहचली असून पैकी ८७ हजार १७१ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६४८ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 9:31 pm

Web Title: 443 new corona cases in pune and 192 new cases in pimpri scj 81 kjp 91 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदच राहणार-महापौर
2 खळबळजनक! मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
3 “मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”
Just Now!
X