24 September 2020

News Flash

दाभोलकर हत्याप्रकरण : विशेष कोर्टानं फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन

दोघेही आरोपी सध्या अटकेत आहेत.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र अंद्धश्रदा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेले प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावला.

तावडे आणि भावे यांनी जुलै महिन्यांत जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, बचावपक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नवंदर यांनी मंगळवारी या दोघांचाही जामीन फेटाळला. दरम्यान, तावडेच्या वकिलांनी कोर्टात आणखी एक अर्ज दाखल करुन तावडेला पोलीस बंदोबस्तात त्याच्या आजारी वडिलांची भेट घेण्याची परवागनी द्यावी अशी विनंती केली होती. इंडियन एक्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, दाभोलकर हत्या प्रकरणात सन २०१६ मध्ये अटक केलेला तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटातील एक सूत्रधार असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर सीबीआयने यापूर्वी सनातन संस्थेचे मुंबईतील वकिल संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी भावे यालाही अटक केली होती. पुनाळेकर यांना नुकताच जामीन मिळाला मात्र भावेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सचिन पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे पाच आरोपी सध्या अटकेत आहेत. याप्रकरणाची पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला घरातून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर ही घटना घडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:11 pm

Web Title: a special court in pune rejects the bail applications of virendrasinh tawde and vikram bhave accused in the narendra dabholkar murder case aau 85 svk 88
Next Stories
1 वैद्यकीय सेवा वाऱ्यावर
2 लायगुडे रुग्णालयातील स्वॅब केंद्र सुरू
3 पिंपरीतील करोना काळजी केंद्रांचे खासगीकरण
Just Now!
X