‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ याचा अर्थ चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे असा होय. महाराष्ट्र पोलीसांच्या या ब्रीदवाक्याचा एक वेगळाच सकारात्मक अर्थ हडपसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. दुष्टांचा नाश करताना ती व्यक्ती म्हणून नव्हे तर तिच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणे असाच व्हायला हवा किंबहुना तो लोणारे यांनी नेमकेपणाने जाणला आहे. गुन्हेगारीकडे वळलेल्या एका अल्पवयीन मुलामधील ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. एपीआय लोणारे यांनी या तरुणाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्याला गुन्हेगारी जगातून बाहेर काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळेच ते वर्दीतला एक बापमाणूस ठरले आहेत.

हडपसर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षाचा रोहित (नाव बदलले आहे) परिस्थितीमुळे नकळत गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रवृत्त झाला. मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार करणाऱ्या रोहितच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या, प्रत्येकवेळी त्याला कायद्याची भीती दाखवत समजावून सांगत सोडण्यात आले. मात्र, तरीदेखील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नव्हता. मात्र, एपीआय लोणारे यांनी त्याला या भाईगिरीच्या प्रवृत्तीचा शेवट काय होतो हे विविध घटनांमधून समजावून सांगितले. वाईट काम सोडण्यासाठी लोणारे साहेबांनी दिलेला आत्मियतेचा सल्ला त्याला पटला. यामुळे अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या या अल्पवयीन रोहितमध्ये पुढील शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र, घरची हालाखीची परिस्थिती असल्याने शिक्षण घेता येणार नाही असे त्याने साहेबांना सांगितले. ही बाब कळताच एपीआय लोणारे यांच्यातील बापमाणूस जागा झाला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मी तुझा शिक्षणाचा खर्च करण्यास तयार असल्याचे त्याल सांगितले. पण, पुन्हा गुन्हेगारीकडे वळला तर बघं अशी वडीलकीच्या नात्याने सक्त ताकीदही दिली.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

सार्वजनिक जीवनात आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांना अनेकदा टीकेला आणि रोषाला सामोरे जावे लागते. मात्र, याच वर्दीमधील लोणारे यांनी रोहितच्या हाती असणारे कोयते आणि तलवारी काढून घेत पेन आणि वही दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कौतुकास्पद कामाबाबत एपीआय प्रसाद लोणारेंशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, मांजरी बुद्रुक येथील एका विद्यालयात रोहितने इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला आहे. समुपदेशन केल्यानंतर तो आता गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडला असून आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने शिक्षणाचा योग्य मार्ग निवडला आहे.

गुन्हेगारी विश्वातून बाहेर आलेला रोहित म्हणाला, ‘माझी आई धुणं-भांड्यांचे काम करुन मला आणि भावाला सांभाळते. गेल्या वर्षभरापासून मी कोयता गँगमध्ये काही मुलासोबत काम करायला लागलो. या काळात अनेकांना मारहाण करणे, धमक्या देणे असे गुन्हे माझ्या हातून घडले. या गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अनेक वेळा माझे समुपदेशन केले. त्यानंतर मी यातून बाहेर पडण्याचे निश्चित केले. आता पुढे काय करायचे असा विचार केल्यावर अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचे असल्याची इच्छा लोणारे साहेबांकडे बोलून दाखविली. त्यावर त्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च करीत असल्याचे सांगत मला शिकून चांगला माणूस हो असा आशिर्वाद दिला. त्यांच्यामुळेच मला शिक्षण घेणे शक्य झाले असून पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.