पुणे : राजस्थानातील पंतप्रधानांचे भाषण देशाच्या ऐक्याच्या विरोधात आहे. पंतप्रधान असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न मला पडला. त्यांचा विरोध केला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अॅड वंदना देशमुख या वेळी उपस्थित होते. महिला, आदिवासी, शिक्षण, विद्यार्थी, पर्यावरण अशा घटकांवर या शपथपत्रात भर देण्यात आला आहे. त्यावेळी पवार बोलत होते.

हेही वाचा : पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”

narendra modi rahul gandhi
कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांचा ओबीसीत समावेश, पंतप्रधानांच्या आरोपांनंतर मागासवर्ग आयोगाचा खुलासा; केला ‘हा’ सवाल!
Varsha Gaikawad Congress
Maharashtra News : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर, भाजपाकडून मात्र..
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या बाबत विचारले असता पवार म्हणाले, पहिल्या टप्प्यात जनमत भाजप विरोधात गेले आहे. त्यामुऴे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत.