निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आज सकाळ पासून वाऱ्याचा वेग वाढला असून शहरातील आणि उद्यानातील ३० झाडं उन्मळून पडलेली आहेत. यात कोठेही जीविहितहानी झालेली नाही. शहरात मध्यमस्वरूपाचा पासून पडत असून सोसाट्याचा वारा सुटलेला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. ते महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादळाचा तडाखा मुंबई, रायगड, ठाणे या ठिकाणी बसण्याची. तर काहीसा परिणाम हा पुणे जिल्ह्यावर होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मंगळवार सायंकाळी पासून च शहरात आणि परिसरात दमदार पावसाने सुरुवात केली. अगोदर हा मान्सूनपूर्व वाटणारा पाऊस चक्रीवादळाची चाहूल असल्याचं सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मध्यरात्री पासून शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळत असून सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित केला असून शहरात ७ ठिकाणी तर विविध उद्यानानातील अंदाजे २५ ते ३० झाडं पडल्याची माहिती अग्निशमन विभाग आणि उद्यान अधीक्षक दत्तात्रेय गायकवाड यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 1:36 pm