News Flash

पुण्यात भाजपाच्या माजी खासदाराला पत्नीसह अटक

चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई

संग्रहित

पुण्यातील भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली आहे. मेव्हण्याला जीव ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि मेव्हणा युवराज ढमाले दोघे २०१० पर्यंत एकत्रित बांधकाम व्यावसायात होते. पण काही कारणास्तव दोघांनी स्वतंत्र व्यवसाय करण्यास सुरुवात केला. त्यानंतर २०१८ मध्ये मेव्हणा युवराज ढमाले यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी युवराज ढमाले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गोता. गुरुवारी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी संजय काकडे आणि उषा काकडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने संजय काकडे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

या प्रकरणी माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, “आमच्यातील कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं आणि पत्नीचे साधं बोलणे देखील झालेले नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करत आहोत”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:24 pm

Web Title: bjp ex mp sanjay kakde arrested and released on bail in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 “मला जे आश्वासन दिलं…”, पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा सुरु असतानाच मेधा कुलकर्णींचा व्हिडीओ आला समोर
2 सातारा रस्ता बीआरटी मार्ग तूर्त बंदच
3 पुण्यात रात्रीच्या तापमानात घट
Just Now!
X