News Flash

११ एप्रिलच्या एमपीएससी परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) रविवारी (११ एप्रिल) होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) रविवारी (११ एप्रिल) होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा

उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

एमपीएससीने पुणे जिल्हा केंद्रावरील तीन परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आले. वाघोलीतील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. तसेच अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय आणि  सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा नºहे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:01 am

Web Title: changes in three sub centers of mpsc examination on 11th april abn 97
Next Stories
1 पुण्यातही लशींचा साठा मर्यादित
2 रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची दमछाक कायम
3 …तर कारवाईचा आयुक्तांचा इशारा
Just Now!
X