पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर लगेचच यशवंत माने यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे.   मात्र भाजपच्या या यशाकडे सर्वच पक्ष संशयाच्या नजरेने बघत आहेत. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाल्याचे समोर आल्याने यात भर पडली आहे. या घडामोडी ताज्या असतानाच निवडणूक निर्णय अधिका-यांची तडकाफडकी बदली झाल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.  निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी बदली चार महिन्यापूर्वीच होणार होती अशी माहिती दिली आहे. निवडणूक असल्याने बदली झाली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
wardha lok sabha
वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश, उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Chandrapur Lok Sabha
चंद्रपूरमधील नाराज हंसराज अहीर यांच्या भूमिकेकडे लक्ष