प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ७८ वर्षे होते. चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. या डेअरीची स्थापना भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली. त्यांच्यानंतर काकासाहेब चितळे आणि नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली. आज काकासाहेब चितळे यांचं निधन झालं आहे.
चितळे डेअरी म्हटलं की श्रीखंड आणि बाकरवडी हे दोन पदार्थ समोर येतातच. पुण्यात चितळे डेअरीची अनेक उत्पादनं प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्येही चितळे डेअरीजचे पदार्थ मिळतात. दुधाच्या व्यवसायापासून सुरु झालेल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यात काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांनी चांगलीच वाढवली. आज काकासाहेब चितळे यांचं मात्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे चितळे उद्योग समूह वाढला. हा उद्योग समूह महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नाही. तर भारतासोबतच जगातही पसरला आहे. या सगळ्या व्याप्तीचे श्रेय जाते ते काकासाहेब चितळे यांनाच. अत्याधुनिक तंत्रज्ञाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध आणि प्रक्रिया, विविध दुग्ध उत्पादनं तयार करण्याचं काम ही कंपनी करते आहे. महाराष्ट्रासह जगभरात एक नामांकित ब्रांड म्हणून चितळे उद्योग समूह ओळखला जातो. चितळे दूध, दही, तूप, बाकरवाडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ही चितळे उद्योग समूहाची ओळख आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 5:47 pm