देशामधील करोनाग्रस्तांची संख्या एक हजार ८०० हून अधिक झाली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ३०० हून अधिक झाली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून २४ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या काळामध्ये देशात लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येतील मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केलं जात आहे. असं असताना अनेकजण जीवनावश्यक वस्तू तसेच इतर कारणांसाठी घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहे. पोलिसांनी कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पोलीस रस्त्यावर कारवाई करत असताना दुसरीकडे पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र नेटकऱ्यांना त्यांच्या हटके भाषेत समजवण्यासाठी पुणे पोलिसांनीही अगदी भन्नाट कल्पना लडवली असून त्यांनी थेट पुणेरी उखाणे ट्विट करत पुणेकरांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यामध्ये लॉकडाउनच्या आधीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांचा पोलिसांकडून समाचार घेतला जात आहेत. तर दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवरही पोलिसांकडून राज्यामधील स्थितीची माहिती पुरवली जात आहे. यामध्ये अगदी अफवा पसरवू नका इथपासून ते कोणत्या दुकानांवर काय कारवाई करण्यात आलीपर्यंतचे अनेक अपडेट्स पोलीस खात्याकडून फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवले जातं आहेत. अशाच पुणे पोलिसांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनदरम्यान बाहेर पडून नका असे संदेश देणारे उखाणे ट्विट केले असून ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Salman Khan House Firing Marathi News
Salman Khan House Firing : गोळीबार केल्यानंतर पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्याकरता आरोपींनी केस कापले, दाढी केली अन्…
thane belapur traffic jam marathi news
ठाणे – बेलापूर वाहतूक कोंडी, घणसोली स्टेशन समोर ट्रक पलटी

नक्की वाचा >> Coronavirus: पोलिसांकडून Whatsapp Admins साठी महत्वाची सूचना, म्हणाले ‘ही’ सेटींग बदला 

पुणे पोलिसांनी ट्विटवरील नेटकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजवण्यासाठी #CoronaUkhana हा हॅशटगच तयार केला आहे. या हॅशटॅग अंतर्गत पुणे पोलिसांनी सर्वात पहिला ‘तुळशीबाग, FC रोड आणि सदाशिव पेठ… सगळीकडे जाऊया पण लॉकडाऊन नंतर भेट’, हा उखाणा ट्विट केला आहे. त्यानंतर याच अकाउंटवरुन इतरही काही उखाणे ट्विट करण्यात आले आहेत. त्यामध्ये, ‘तिखट मिसळीवर घ्या एक वाटी तरी… करोनापासून वाचण्यासाठी रहा आपल्या घरी’, ‘दररोज पकड़तो आम्ही गुंड आणि चोरांना.. स्वच्छतेची काळजी घ्या होणार नाही करोना’ असे भन्नाट ट्विट पोलिसांनी केले आहेत. अनेक पुणेकरांनाही या ट्विटला उखाण्यामध्येच उत्तर देत आपला सहभाग नोंदवला आहे. ‘आमरस, मस्तानी आईसक्रीम वाट बघतायत आपली… लॉकडाउन पाळून कोरोनाला मारुयात टपली’ असा उखाणा मंदारने ट्विट केला आहे. तर ‘रात्रंदिवस पोलीस, डॉक्टर करत आहेत कोरोनाविरुद्ध जीवाचा आटापिटा… तुम्ही गप घरी बसा नाहीतर, एक एक को पकडकर पिटा’, असं संदीप म्हणतोय.

नक्की वाचा >> ‘दोन हाणा पण सांगा कोण आहे हा कवळा दाणा…’; फेसबुकवर आला जुन्या फोटोंवर मजेदार कमेंट करण्याचा ट्रेण्ड

नक्की वाचा >> “चॉकलेट असतं डार्क, भाऊंना पाहून पोरी म्हणतात हाच माझा मार्क”; मराठी पोरांनी झकरबर्गलाही नाही सोडलं

याआधीही मुंबई पोलिसांनी आठवड्याचे राशीभवष्य म्हणून सर्व राशीचे लोकं घरीच बसतील असं मजेदार ट्विट केलं होतं. तर युपी पोलिसांनाही विश्वचषक स्पर्धेमध्ये धोनीचा धावबाद होतानाचा फोटो पोस्ट करुन ‘हा आतमध्ये असता तर किती बरं झालं असतं असं आपल्या सर्वांना वाटलं होतं. तेच आता तुम्हीही करा,’ असा संदेश दिला होता.