News Flash

एका चार्जिगमध्ये ३० किमी पळणारी सायकल

पुण्यातील ‘स्टार्ट अप’ कंपनीचा प्रयोग; ताशी २० किमीची वेगक्षमता

पुण्यातील ‘स्टार्ट अप’ कंपनीचा प्रयोग; ताशी २० किमीची वेगक्षमता

आपल्याकडे अद्याप इलेक्ट्रिक सायकली फारशा वापरात नसल्या, तरी आता विविध उद्योगांकडून नवनवीन प्रकारच्या इलेक्ट्रिक सायकली सादर केल्या जात आहेत. पुण्यातील एका ‘स्टार्ट अप’ कंपनीने अशीच एक सायकल बनवली असून तिचे सुटे भाग भारतीय बनावटीचे असतील, तसेच ती तुलनेने स्वस्त असेल, असा कंपनीचा दावा आहे.

‘इंडियन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्यूअर्स पार्क’ व ‘बिझनेस इक्युबेटर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्टार्ट अप कंपन्यांसाठीच्या ‘इस्बा’ या नुकत्याच झालेल्या परिषदेत ही सायकल सादर करण्यात आली. ‘रनिंग मशीन’ असे या सायकलचे नाव असून ‘गेट माय सोल्यूशन्स प्रा. लि.’ या कंपनीने ती तयार केली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ती बाजारात येऊ शकेल, असे कंपनीचे संचालक जयवंत महाजन म्हणाले.

या सायकलची बॅटरी ‘लेड अ‍ॅसिड’ प्रकारची असून ती २० किमी प्रतितास वेगाने पळू शकेल. सायकलची बॅटरी कोणत्याही हत्याराशिवाय सहज बाहेर काढून घरी चार्ज करता येते, तसेच एकदा चार्जिग केल्यावर सायकल ३० किमी पळते. एका चार्जसाठी ०.७ युनिट्स वीज खर्च होते, असे महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘टायर व टय़ूब वगळता या सायकलचे सुटे भाग व बॅटरी भारतीय बनावटीची असेल. या सायकलची किंमत दहा हजार रुपये असून ती या प्रकारच्या सायकलींमध्ये तुलनेने स्वस्त आहे. ग्रामीण भागासह, मोठय़ा कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये किंवा प्राणिसंग्रहालयांसारख्या ठिकाणी याचा वापर करता येईल.’’

या सायकलला हेडलाइट, टेललाइट, साइड इंडिकेटर आणि अ‍ॅक्सिलरेटरही आहे. सपाट रस्त्यांवर ती पायडल न मारताही चालू शकते, तसेच चढावर पायडल मारतानाही फारसा जोर लावावा लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:01 am

Web Title: cycle run 30 km in one time charging
Next Stories
1 टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष उत्सवातच सहभागी व्हा – सूर्यकांत पाठक
2 शिक्षकांची प्रतिष्ठा वाढवणे गरजेचे – शिक्षणमंत्री
3 डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरूच!
Just Now!
X