News Flash

माजी खासदार राजू शेट्टी यांना करोना संसर्ग, उपचारांसाठी पुण्यात दाखल

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

माजी खासदार राजू शेट्टी यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आहे. बुधवारपासून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.

राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात राज्यभर दौरा, आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांना करोनाची बाधा झाली. त्यांचा अहवाल पाच दिवसापूर्वी सकारात्मक आला. ते घरीच अलगीकरण होऊन वैद्यकीय उपचार घेत होते. काल रात्री त्यांच्या रक्तामध्ये दोष आढळल्याने जयसिंगपूर येथील डॉ. सतीश पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला होता. तर, पुढील वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी त्यांना आज पुणे येथे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहेत. येथे त्यांच्यावर ते करोनामुक्त होईपर्यंत उपचार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ही सांगण्यात आले.

राजू शेट्टी यांनी व्हिडीओमध्ये काय म्हटलं आहे?

“१ सप्टेंबरला माझी करोना टेस्ट निगेटिव्ह होती. मात्र ८ सप्टेंबरला माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. ८ तारखेला ते घरीच होते. डॉ. सतीश पाटील आणि इतरांनी चर्चा करुन ठरवलं की घरीच उपचार द्यायचे. त्यामुळे मी घरीच उपचार घेतो आहे. ”

८ सप्टेंबरला त्यांनी हे म्हटलं होतं. मात्र ९ तारखेला त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजू शेट्टी यांची पत्नी आणि मुलगा सौरभ या दोघांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुरुवातीला सगळे घरीच क्वारंटाइन झाले होते. मात्र बुधवारी राजू शेट्टी यांना अॅम्ब्युलन्सने पुण्यात आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


									

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 2:14 pm

Web Title: former mp raju shetty admitted to pune for treatment of corona infection scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘लायगुडे’च्या खासगीकरणाचा घाट
2 रुग्णांना दाखल करून घेतानाच रक्तद्रव दानासाठी संमती
3 शहरातील विद्युत रोहित्र ‘छुपे बॉम्ब’
Just Now!
X