पुणे शहरात दिवसभरात ७३९ करोना बाधित रुग्ण वाढले असुन, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख १ हजार ९२८ झाली आहे. आजपर्यंत ४ हजार ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४१२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर १ लाख ९२ हजार ५०१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन?; पुढील आठ दिवस ठरवणार पुणेकरांचं भविष्य

दरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्वाधिक रुग्णसंख्या होती. सध्याची करोनाची लाट पाहता ही रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञा शिक्षण आणि संशोधन संसख्या (आयसर) आणि टाटा कन्सल्ट्सी सर्व्हिसस (टीसीएस) या संस्थांनी केलेल्या पाहणीतून सोर आला आहे. ही रुग्णसंख्या वाढू द्यायची नसल्यास काही उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत शास्त्रोक्त विश्लेषण व अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसांमध्ये सरसकट टाळेबंदीऐवजी नियंत्रित मात्र, कोणत्या प्रकारचे निर्बंध लागू करायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे.

Coronavirus : राज्यात आजही ८ हजारांहून अधिक नवे करोनाबाधित वाढले, ५१ रुग्णांचा मृत्यू

तर, राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात काल(शुक्रवार) ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित आढळल्यानंतर, आजदेखील ८ हजार ६२३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून करोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.