राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून उद्घाटन करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

पुणे : उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही गेल्या सहा महिन्यांपासून पूल खुला न करण्यात आल्यामुळे अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ या दरम्याच्या उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उड्डाणपुलाचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या प्रकारानंतर महापालिके नेही तातडीने उड्डाणपुलाचे गुरुवारी (१० जून) अधिकृत उद्घाटन होईल, असे जाहीर के ले.

पंडित नेहरू रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ या दरम्यान महापालिके ने उड्डाणपुलाची उभारणी के ली आहे. उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा महापालिके कडून करण्यात आला होता.  उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने वाहनचालकांकडून करण्यात येत होती. मात्र उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पर्वती मतदार संघाच्या वतीने नागरिकांसाठी तो खुला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष संतोष नागरे, पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, यांच्यासह संजय दामोदरे, योगेश पवार, प्रशांत कु दळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, टाळेबंदीच्या नियमात शिथिलता आणण्यात आल्यानंतर भाजपने निष्क्रियता दाखविली आहे. पक्षाच्या मोठय़ा नेत्याच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या हट्टापायी उद्घाटन रखडले होते. उड्डाणपूल सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाला शिवसेनेकडून निवेदनही देण्यात आले होते, असे सांगत शिवसेनेच्या वतीनेही उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकु डे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, विजय देशमुख, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, अमोल देवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

आज अधिकृत उद्घाटन

उड्डाणपुलाचे उद्घाटन एकाच दिवशी दोन वेळा झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे गुरुवारी उद्घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी दुपारी दीड वाजता प्रिन्स मंगल कार्यालयासमोर, डायस प्लॉट येथे हा कार्यक्रम होईल, असे महापालिके कडून स्पष्ट करण्यात आले. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला के ल्यानेच महापालिके ला जाग आली, असा दावा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.