प्रशासनाचे सुधारित आदेश

पुणे : टाळेबंदी काळात पुणे, पिंपरी चिंचवड, हवेली तालुक्यातील माहिती तंत्रज्ञान कं पन्यांना १५ टक्के  कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू ठेवण्याचे सुधारित आदेश सोमवारी सायंकाळनंतर प्रशासनाकडून काढण्यात आले. तर, पिंपरी चिंचवड शहरातील नोकरदारांना प्रशासनाकडून परवानगी असलेल्या आस्थापनांत कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, ‘पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतील भागात टाळेबंदी लागू असणार आहे. त्यानुसार हिंजवडी, माण, चाकण, तळेगाव, नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावरील काही भागातील उद्योग बंद राहणार आहेत. उर्वरित जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील उद्योग नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. माहिती तंत्रज्ञान कं पन्यांना १५ टक्के  कर्मचारी उपस्थितीत काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना परवानगी असलेल्या आस्थापनांत कामावर जाताना दुचाकी घेऊन जाण्यासही परवानगी दिली असून आस्थापनांच्या परवानगीचा कागद स्थानिक पोलीस ठाण्याकडून पोच घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.’   दरम्यान, उद्योग विभागाने सुरू के लेल्या संके तस्थळावरून सोमवारी दिवसभरात जिल्ह्य़ातील विविध उद्योगांच्या कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या ३८१ बस, मिनीबसना परवानगी देण्यात आली आहे. तर, ५७२९ कर्मचारी, अधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली, असेही सुरवसे यांनी स्पष्ट केले.

कंपन्यांचे पत्र म्हणजेच परवाना

पुणे शहरातील बँका, औद्योगिक आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कं पन्या, दूरसंचार कं पन्या, कृषी क्षेत्राशी संबंधित कं पन्या टाळेबंदीतही १५ टक्के  मनुष्यबळासह सुरू ठेवण्याबाबत महापालिके ने सुधारित आदेश प्रसृत के ले. या कं पन्यांमधील कर्मचारी वर्गाला रोजच्या परवान्यासाठी आता पोलिसांच्या परवान्याची गरज नसून संबंधित कं पनीच्या व्यवस्थापकाने दिलेले पत्र परवाना म्हणून ग्राह्य़ धरले जाणार आहे.

ग्रामीण भागातील फक्त २५ ग्रामपंचायतींमध्ये टाळेबंदी

सोलापूर रस्त्यावरील आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, ऊरळी कांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, नगर रस्त्यावरील वाघोली, केसनंद, तर सिंहगड रस्त्यावरील नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक व खुर्द, डोणजे, खानापूर आणि वडकी व थेऊर अशा फक्त २५ ग्रामपंचायतींमध्ये टाळेबंदी लागू असून उर्वरित जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतर ठिकाणचे व्यवहार पूर्ववत असणार आहेत.