News Flash

पुण्यात कोट्यावधीच्या कर्जातून मित्राचाच खून; ब्लूटुथच्या मदतीने लागला आरोपीचा छडा

पोलिसांना जळलेल्या मृतदेहाशेजारी ब्लूटुथ सापडलं

पुण्यात कोट्यावधीच्या कर्जातून मित्राचाच खून; ब्लूटुथच्या मदतीने लागला आरोपीचा छडा

पुण्याच्या बाणेर येथे खून करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह जाळण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपीचा शोध हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने लावला आहे. घटनास्थळी मिळालेल्या ब्लूटुथवरून खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कोट्यवधींचे कर्ज असल्याने ओळखीच्या व्यक्तीचा खून करून बाणेर येथील दर्ग्याजवळ त्याचा मृतदेह जाळण्यात आला आणि तो व्यक्ती आपण स्वतः चा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संदीप पुंडलिक माईनकर असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मेहबूब दस्तगीर शेख याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याच्या बाणेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता. तेव्हा, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने निरीक्षण केले असता मयत व्यक्तीच्या खिशात एक अर्धवट जळालेली चिठ्ठी मिळाली. तसेच घटनास्थळी कानातील ब्लूटुथही मिळाले. चिठ्ठीवरून मयत व्यक्तीचे नाव संदीप असल्याचं समोर आलं. तर, ब्लूटुथ कोणाचे यावरून आरोपीचा शोध सुरू झाला. त्याचदरम्यान काळेवाडी येथून आरोपीच्या पहिल्या पत्नीने मेहबूब हा बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. संबंधित घटनेविषयी पत्नीला काहीच माहिती नव्हती. अखेर, पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन ब्लूटुथचा तपशील आणि इतर चौकशी केल्यानंतर आरोपी हाच असल्याचं उघड झालं. तसेच आरोपीवर कोट्यवधींचे कर्ज होते शिवाय दोन बायका असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आरोपी असं कृत्य करू शकतो अशी खात्री पोलिसांची झाली.

पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सध्या दिल्लीमध्ये असल्याचं समजलं. हिंजवडी पोलीस दिल्लीला रवाना झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी हा दुसऱ्या पत्नीसोबत पुण्यात आला होता. दौंड परिसरात रेल्वेतूनच आरोपीला गुन्हे शाखा युनिट चार आणि हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, आरोपी मेहबूबकडे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी कर्जबाजारी झालेलो असून माझा शेवट करत आहे. माझा मृतदेह बाणेर भागात मिळेल असे लिहिले आढळले आहे. त्यानुसार या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. आरोपी आणि मयत हे दोघे ही काही वर्षांपूर्वी एका कंपनीत कामाला होते त्यांची ओळख होती. याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्याचा खून करून आपण स्वतः असल्याचं पोलिसांना भासवून कोट्यवधींच्या कर्जापासून मुक्तता मिळेल अस वाटलं होतं. मात्र त्याचा डाव फसला. गुन्ह्याचा तपास आणि आरोपीला अटक करण्याची कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखा युनिट चारचे प्रसाद गोकुळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे यांच्यासहीत त्यांच्या पथकातील कर्मचारी सहभागी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 4:18 pm

Web Title: killer found due to mobile bluetooth scsg 91 kjp 91
Next Stories
1 पुण्यातील धक्कादायक प्रकार, आजाराने नाही तर डॉक्टरनेच केला घात!
2 व्यायामशाळा प्रशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा
3 यंदा सुवासिक आंबेमोहोर तांदूळ महाग
Just Now!
X