टेंभू, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणी उपसा
पुणे : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधून कृष्णा, पंचगंगा नद्यांमध्ये सोडलेले २० ते २४ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी उपसा करून ते सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागांत यंदाही पोहोचवण्यात येणार आहे. या भागातील टेंभू, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून हे पाणी उपसा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे यंदाही कृष्णा, पंचगंगा नद्यांचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने के ले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर विसर्गाचे पाणी कृष्णा, पंचगंगा नद्यांमधून पुढे कर्नाटकात जाते. पावसाळ्यात विसर्गाचे काही पाणी दुष्काळी भागात वळवण्याबाबत जुनी मागणी होती. त्याबाबत जलसंपदाच्या पुणे विभागाने नियोजन करून गेल्या वर्षी पाणी उपसा करून दुष्काळी भागाला दिले होते. सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनांद्वारे पाण्याचा उपसा करून ते सांगली व सोलापूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. परिणामी पुराचा धोकाही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. कडेगाव, तासगाव, विटा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा या ठिकाणच्या तलावांत हे पाणी सोडण्यात येणार आहे.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

‘म्हैसाळ योजना जुनीच आहे. मात्र, या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (पीएमके वायएस) समावेश झाल्यानंतर सन २०१७ मध्ये मोठी गती मिळाली. त्यानंतर २०१७-१८ या वर्षात या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विभागाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला. या निधीमधून के लेल्या कामांमुळे म्हैसाळ योजनेंतर्गत पाचव्या टप्प्याच्या पुढे म्हणजेच सांगलीतील जतपर्यंत पाणी जाऊ शकले.

तसेच जतमधील तीन उपसा सिंचन योजना दीड वर्षांत कार्यान्वित करण्यात आल्या. आता या योजनांमधून सांगोला, मंगळवेढा, जत अशा दुष्काळी भागात पाणी देता येऊ शकते. या भागातील कामे या निधीतून करण्यात आली. तसेच पंप, जलवाहिनी, व्हॉल्व्ह अशी यांत्रिकीची कामे  पुन्हा नव्याने करण्यात आली’, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले यांनी दिली.

कार्यवाही सुरू

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांमधून दुष्काळी भागातील शेतीसाठी पाणी दिले जाते. या योजनांमधूनच पावसाळ्यात विसर्ग करतेवेळी पाणी देण्याची मागणी दुष्काळी भागातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. पाणी उपसा करण्याच्या खर्चावरून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. मात्र, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या वर्षी निर्णय घेऊन १७ ऑगस्ट २०२० पासून कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार दुष्काळी भागातील ६५ तलाव आणि १०० पेक्षा जास्त बंधारे भरण्यात आले होते. यंदाही त्याचप्रमाणे पाणी उपसा के ला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.