News Flash

Lockdown: कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेली शेवटची बस पुण्यात दाखल

या बसमधून पुण्यात दाखल झालेले एकूण ७४ विद्यार्थी आणि ८ चालक यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

संग्रहित छायाचित्र

राजस्थानातील कोटा येथून पुण्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शेवटची बस पुण्यात दाखल झाली. त्यामुळे इथं अडकून पडलेल्या पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता स्वारगेट बसस्थानकात ही बस पोहोचली.

या बसमधून पुण्यात दाखल झालेले एकूण ७४ विद्यार्थी आणि ८ चालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणामध्येही करोनासंबंधित लक्षणे आढळून आली. तसेच कोणीही आजारी आढळले नाहीत. त्यामुळे या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारुन १४ दिवस घरातच राहण्याचा राहण्याचा सल्ला देत घरी पाठवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 9:44 am

Web Title: lockdown the last bus carrying students stranded at kota arrives in pune aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे पोलिसांना महापौरांनी ठोकला ‘सलाम’, मुसळधार पावसातील ‘तो’ व्हिडिओ पाहून दिली प्रतिक्रिया
2 Coronavirus : पुणे शहरात दिवसभरात 93 नवे रुग्ण, सहा मृत्यू
3 पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपले
Just Now!
X