राष्ट्रवादी नगरसेवकाची शरद पवार यांच्याकडे तक्रार
पिंपरी महापालिकेच्या वतीने चिखली-टाळगाव येथे जगद्गुरू संत तुकाराममहाराज यांच्या नावाने संतपीठाची उभारणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही विभागीय आयुक्तांनी तो विषय अडवून ठेवल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये असलेल्या गायरान क्षेत्रात संतपीठ उभारण्यात येणार आहे. संतपीठासाठी निश्चित केलेली ही आठ एकर जागा पालिकेच्या ताब्यात आलेली नाही. महापालिकेच्या स्तरावर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावास सभेने मंजुरी दिली आहे. दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
संतपीठाच्या अभ्यासक्रमाचा प्राथमिक मसुदा तयार करून अभ्यासक्रमाचे काही टप्पेही निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, प्रकल्पाची जागाच उपलब्ध होत नसल्याने पुढे काहीच होत नाही. विभागीय आयुक्तांकडे हा विषय बराच काळ प्रलंबित आहे. यासंदर्भात, आपण वैयक्तिक लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक साने यांनी पवार यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp councillor complaint about divisional commissioner to sharad pawar
First published on: 28-08-2016 at 04:12 IST