20 October 2020

News Flash

मुंबई पालिकेच्या गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात उचलत आहेत कचरा!

मुंबई येथील ठेकेदाराला दिले आहे कंत्राट

पिंपरी-चिंचवड शहरात कचरा समस्या गहन होत चालली असून चक्क बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या शहरात दिसत आहेत. त्या नेहमी प्रमाणे शहरातील कचरा उचलताना दिसत असून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील हेडगेवार भवन येथे या गाड्या थांबल्या असून सकाळच्या वेळी कचरा उचलण्यास शहरात जागोजागी दिसतात.

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक दिवसांपासून कचरा प्रश्न नागरिकांना आणि सत्ताधाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाकडून दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या कक्षाबाहेर कचरा टाकून आंदोलन केले होते. तेव्हा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्यातून वाट काढून बाहेर यावे लागले होते. शहरातील अनेक भागात कचऱ्याचे मोठे मोठे ढिगारे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे धोका निर्माण होऊ शकतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे पासिंग झालेले नाही. त्यामुळे गाड्याना रस्त्यावर उतरून कचरा जमा करता येत नाही. याच कारणाने अँथोनी नावाच्या कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिला आहे. ठेकेदाराचे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे देखील कचरा उचण्याचा ठेका असून तेथील काही गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत. त्या शहरातील कचरा उचलताना दिसत आहेत. असे पिंपरी-चिंचवड शहरात कधीच पाहायला मिळालेले नव्हते. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 9:09 pm

Web Title: pimpri chinchwad bmc garbage vehicles running on road jud 87
Next Stories
1 पुण्याचा नवा ‘गोल्डमॅन’! अंगावर बाळगतो तब्बल ५ किलो सोनं
2 अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज
3 कोटय़वधी लिटर पर्जन्य जलसंचय
Just Now!
X